मोदींसोबत सेल्फी घेण्याचा मोह कोणाला नाही होणार? मोदींसोबत आपण सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड केला तर काय सॉलिड भाव मिळेल ना आपल्याला? शिवाय पंतप्रधानांसोबत थेट सेल्फी काढला म्हणून इतर खार खाणारे असतील ते वेगळे अशीही अनेकांची मानसिकता असते. मग रामलीलेतले हे कलाकार तरी कसे मागे राहतील. या रामलीलेतल्या रामालासुद्धा मोदींसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही बघा. त्यामुळे रामाच्या वेषातल्या या कलाकाराने आपला फोन काढला आणि थेट मोदींना आपल्यासोबत सेल्फी काढण्याची गळ घातली. आता रामलिलेतला का असेना राम तो रामच त्यामुळे मोदीही तयार झाले असावे बहुतेक. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा : मोदी माझ्यासाठी काम करतात म्हणणा-या तरुणाला मोदींनी दिले उत्तर
माहिती व प्रसारण मंत्री वेंकैया नायडू यांच्या घरी रविवारी तेलगू नववर्ष ‘उगादी’ निमित्त एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्तांनी कार्यक्रमांची रेलचेल होतीच. शिवाय शाही भोजनासाठी अनेक मंडळीही नायडूंच्या घरी जमली होती. या निमित्ताने नायडू यांनी आपल्या घरात ‘जटायु मोक्षम’ कार्यक्रम ठेवला होता. या सोहळ्यासाठी खास मोदींना देखील निमंत्रण दिले होते. तेव्हा मोदींना पाहाताच या सा-या कलाकरांचा त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला.