Indpendence Day 2024 PM Modi Turban: भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी त्यांच्या पेहराव आणि फेट्यामुळे चर्चेत असतात. त्यांची फेटा बांधण्याची शैलीही सर्वात आकर्षक असते. ते त्यांच्या पहिल्या टर्म (२०१४) पासून तिसऱ्या टर्म (२०२४) पर्यंत दरवर्षी स्वातंत्र्यदिन वेगळा फेटा, पगडी परिधान करताना दिसले आहेत. यंदाही त्यांचा एक वेगळा लूक पाहायला मिळाला. या स्वातंत्र्यदिनी पीएम मोदींनी भगव्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या फेट्यात दिसले. या फेट्याबरोबर त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. स्वातंत्र्यदिनी परिधान केलेल्या त्यांच्या फेट्याचे खास वैशिष्ट्य जाणून घेऊ…

पंतप्रधान मोदींनी राजस्थानी लहरिया प्रिंटचा फेटा बांधला होता, लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पीएम मोदींनी अनेकवेळा राजस्थानी प्रिंट असलेला फेटा परिधान केला आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्येही पीएम मोदींनी राजस्थानी प्रिंटेड फेटा परिधान केला होता. त्यावेळीही पंतप्रधान मोदींनी बहुरंगी राजस्थानी बांधणी प्रिंटेड असा फेटा घातला होता. २०२४ मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी दरवर्षी स्वातंत्र्यदिनी विविध रंगांचा फेटा किंवा पगडी परिधान करताना दिसतात. ज्या माध्यमातून भारतातील समृद्ध विविधता आणि संस्कृती दर्शवते. (pm narendra modi turban)

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
maharashtra assembly election 2024 in chandrapur nagpur will narendra modi sabha rally benefit to the mahayuti candidate or not
मोदींच्या सभेचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का?

यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वाधिक चर्चा पीएम मोदींच्या फेट्याची रंगली. पंतप्रधान मोदींनी परिधान केलेल्या लहरी प्रिंट फेट्यात केशरी, पिवळा आणि हिरवा असा कॉम्बिनेशन रंग पाहायला मिळाला आहे.

Read More News On Independence Day Live Updates: पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केला समान नागरी कायद्याचा उल्लेख; वन नेशन, वन इलेक्शनसाठीही केलं आवाहन, म्हणाले…

लहरिया प्रिंटची कहाणी राजस्थानच्या वाळूशी जोडलेली आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील वाळवंटातील वाळूवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे डायगोनल पॅटर्न (लहरी) तयार होतात. लहरिया प्रिंट याच पॅटर्नपासून प्रेरित असल्याचे मानले जाते. हे सुंदर रंग संयोजन असलेले पारंपारिक कापड टाय आणि डाई प्रिंट तंत्र आहे.

लहरिया डिझाईन बनवण्यासाठी आधी कापड धाग्याने बांधले जाते आणि नंतर त्यावर प्रिंट केले जाते. वेव्ह प्रिंटची फॅशन आजची नाही तर १८ व्या शतकातील आहे. राजस्थानात फेटा घालण्याची प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे.

हेही वाचा – Independence Day 2024 Wishes : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त Texts, WhatsApp Messages द्वारे खास मराठीतून पाठवा शुभेच्छा, पाहा यादी

पंतप्रधान मोदींचा फेटा खास का आहे?

पंतप्रधान मोदींच्या फेट्यामध्ये अनेक रंग असले तरी केशरी रंग सर्वात जास्त आहे. वास्तविक,केशरी रंग हा भगवान रामाचा आवडता रंग मानला जातो. या कारणामुळे त्यांच्या फेट्याला रामाच्या आवडत्या रंगाशी जोडले जात आहे. या वर्षी 22 जानेवारी रोजी त्यांनी अयोध्या राम मंदिराचा अभिषेक केला आणि रामललाच्या पुतळ्याचे अनावरणही केले. हा फेटा परिधान करून त्यांनी रामाप्रती आपली भक्ती दाखवली आहे, असे म्हटले जाते.