पंतप्रधान मोदी शनिवारी हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. हा बोगदा समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे. मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे. मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणाऱ्या या ९.०२ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी हे रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा