PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मोदींच्या वाढदिवसासाठी भाजपकडून अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. यातीलच एक म्हणजे दरवर्षी मोदींच्या वाढदिवस सप्ताहात पार पडणारा लिलाव कार्यक्रम. यंदाही मोदींना भेट म्हणून मिळालेल्या तब्बल १२०० वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारे पैसे नमामी गंगे मोहिमेसाठी दान दिले जातील. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची हे चौथे वर्ष आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा लिलाव pmmementos.Gov.In या वेब पोर्टलद्वारे आयोजित केला जाईल आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हा लिलाव पार पडणार असल्याचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले, या संग्रहालयातच भेटवस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी देतायत BA ची परीक्षा? बिहारच्या विद्यापीठाने जारी केले हॉलतिकिट, पाहा फोटो

भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू ज्या पंतप्रधान मोदींना काही मान्यवरांनी भेटदिल्या आहेत त्यांचा हा लिलाव सामाजिक कार्याच्या स्वरूपात पार पडेल. या भेटवस्तूंची खरेदी सामान्य माणसांनाही करता येवती यासाठी किंमत १०० रुपयांपासून सुरु होऊन १० लाख रुपयांपर्यंत असेल.

लिलावात यंदा कोणत्या वस्तू असणार?

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची मूर्ती
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली हनुमानाची मूर्ती आणि सूर्यचित्र
  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी भेट दिलेले त्रिशूल यांचा समावेश आहे.
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिलेली कोल्हापूर येथील महालक्ष्मीची मूर्ती
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेल्या भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्ती
  • पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट
  • चित्रे, शिल्पे, हस्तकला व पारंपारिक अंगवस्त्र, शाल, टोपी-फेटे, औपचारिक तलवारी
  • अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती

यंदाच्या लिलावातील सर्वात महाग भेटवस्तू म्हणजे इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मॉडेल पुतळा, जो पाहून पंतप्रधानांनी इंडिया गेटचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली होती. या वस्तूंची किंमत १०० रुपयांपासून ५ ते १० लाखांपर्यंत उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार किंमत टाकून तुम्हीही या वस्तू मिळवू शकता.

Story img Loader