Drumstick Health Benefits : सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी शेवग्याच्या पराठ्यांची रेसिपी सांगितली आहे. शेवग्याची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. शेवगा आरोग्यासाठी अमृत मानला जातो आणि सध्या तर शेवग्याच्या पराठ्याचीही खास चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी फिट इंडिया मोहिमेनिमत्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण शेवग्याचे पराठे खातो, असे आवर्जून सांगितले होते. पुन्हा तो जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदी स्वत: बनवायचे पराठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंपल आणि हेल्दी पदार्थ खाणे पसंत करतात. यामध्ये शेवग्याचाही समावेश आहे. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं, त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. फक्त शेंगाच नाही, तर त्याच्या पानातदेखील अनेक पौष्टिक घटक असतात. शेवग्याचा पराठा हा एक उत्तम चविष्ट पौष्टिक पदार्थ आपणही करू शकतो. या व्हिडीओमध्येही याची रेसिपी दिली आहे. चला तर पाहूयात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मोदी सांगत आहेत, शेवगा हा आपल्या शरीरासाठी एकंदरित पौष्टिक असतो, त्यामुळे मी स्वत: त्याचे पराठे बनवायचो आणि आजही आठवड्यातून एकदा माझ्या जेवणात शेवगा असतोच. पुढे व्हिडीओमध्ये शेवग्याच्या पराठ्यांची रेसिपीही दाखवण्यात आली आहे, ती तुम्ही पाहू शकता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video: ऑम्लेट खा आणि जिंका एक लाख; दुकानदाराचं अनोखं चॅलेंज; ९९ टक्के लोकांनी स्वीकारलाय पराभव
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. काहींनी म्हटलंय, आता मीसुद्धा शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करेन. तर दुसरा म्हणतो, मलाही शेवग्याच्या शेंगा आवडतात. दरम्यान, शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याचा पाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. या पाल्याची भाजी केली जाते. यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण पुरेपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, थकवा दूर होतो.