PM Narendra Modi Safari Look : पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बांदीपूर नॅशनल पार्कसह मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला खास लुक चर्चेत आहेत. काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी शर्ट, काळे शूज आणि स्लीव्हलेस जॅकेटसह मोदी दिसत आहेत. मोदींचा हा लुक व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन
म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाणार आहेत. पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही पंतप्रधान भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रोजेक्ट टायगरच्या सुवर्ण महोत्सवाबाबत एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या दरम्यान वाघांच्या संरक्षणाबाबत अमृतकाळातलं व्हिजन, काही प्रकाशनं, वाघ आणि अभयारण्यातले प्रभावी घटक. वाघांच्या संख्येची घोषणा या संदर्भातला अहवाल प्रकाशित करणार आहेत. प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक नाणंही प्रकाशित केलं जाणार आहे.