पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या दौऱ्यावर असताना तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी यांच्यासमोर तेथील काही रशियन मुलींनी हिंदी गाणी सादर केली. मुलींचे हिंदी भाषेबद्दलचे प्रेम आणि ती जाणून घेण्याची जिज्ञासा यामुळे मोदी चांगलेच प्रभावित झाले. मोदींनी या मुलींना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.

मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना तेथील एका शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी हिंदी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मोदींचे हिंदी भाषेतच स्वागत केले. आम्ही हिंदी भाषा शिकत आहोत. हिंदी भाषेच्या माध्यमातून आम्हाला भारताला आणखी जवळून जाणून घेता आले. ही संधी दिल्याबद्दल आमच्या राष्ट्रपतींचे आभार मानतो, असे विद्यार्थिनींनी सांगितले. तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. तुम्ही हिंदी भाषेचे शिक्षण कधीपासून घेत आहात, असा प्रश्न मोदी यांनी त्यांना विचारला. त्यावर दोन-तीन वर्षांपासून हिंदी शिकत आहोत, असे उत्तर या मुलींनी दिले. तसेच हिंदी चित्रपट पाहता का, असं मोदींनी विचारल्यानंतर आम्हाला सर्वच हिंदी चित्रपट आवडतात, असे उत्तर मुलींनी दिले. यावेळी मुलींनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता…’, ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन…’ ही गाणी सादर केली. ती ऐकून मोदींनी मुलींचे तोंडभरुन कौतुक केले. एका मुलीला तर त्यांनी संगीत शिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मोदींनी त्यांच्यासोबत फोटोही काढले. तसेच त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.

Story img Loader