PM Narendra Modi Opposing EVM Speech Video: लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या देशभरात चर्चेत आहे. १३ डिसेंबरला लोकसभेत झालेली घुसखोरी असो किंवा खासदारांचे निलंबन या ना त्या कारणाने नेत्यांच्या, वादाचे आंदोलनाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मात्र आता स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत ईव्हीएम वापरण्यास विरोध करताना दिसत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल MP Youth Congress ने वायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल व्हिडिओचे स्क्रीनग्रॅब घेऊन आम्ही आमचा तपास सुरू केला, व्हायरल व्हिडीओ फारसा स्पष्ट नव्हता. यातून आम्हाला यूट्यूब शॉर्टमध्ये एक व्हिडिओ मिळाला. आपण पाहू शकता की, पंतप्रधान मोदी ज्या व्यासपीठावरून बोलत होते त्या व्यासपीठावर ‘परिवर्तन रॅली’ लिहिलेले होते.
त्यानंतर आम्ही ‘परिवर्तन रॅली’ हा शब्द वापरून गूगल कीवर्ड सर्च केले. त्यानंतर आम्हाला ‘नरेंद्र मोदींच्या’ यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहायला मिळाला.
या व्हिडीओचे शीर्षक होते: PM Modi at Parivartan Rally in New Moradabad, Uttar Pradesh
हा व्हिडिओ सात वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत १४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
मतपत्रिकेबाबत त्यांची नेमकी मते सुमारे ५५ मिनिटे १८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ऐकू येतात.
मोदी यांचे हिंदीत स्पष्ट शब्द होते: कुछ लोग कहते है हमारा देश गरिब है, लोग अनपढ़ है, लोगो को कुछ आता नहीं. दुनिया के पढ़े लिखे देश भी, जब चुनाव होता है न, तो बैलट पेपर पर, नाम पढ़ कर के, फिर ठप्पा मारते है आज भी, अमेरिका में भी. ये हिंदुस्तान है, जिसे आप गरीब कहते हो, अनपढ़ कहते हो वो बटन दबा के वोट देना जानता है.
हे ही वाचा<< झाडाच्या खोडापासून रबर बँड कसा तयार होतो? संपूर्ण प्रक्रिया पाहून नेटकरी चिडले, म्हणाले, “या बिचाऱ्यांना..”
भाषांतर: काही लोक म्हणतात आपला देश गरीब आहे, लोक निरक्षर आहेत, लोकांना काही कळत नाही. जगातल्या सुशिक्षित देशांमध्येही निवडणुका झाल्या की, बॅलेट पेपरवर नावं वाचून मगच मतदान केलं जातं, असं अमेरिकेतही घडतं. हा भारत आहे, ज्याला तुम्ही गरीब, अशिक्षित म्हणता त्याला बटण दाबून मतदान कसे करायचे ते कळते.
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतकाळात निवडणुकीसाठी ईव्हीएमच्या वापराविरोधात बोलल्याचा दावा करणारी व्हायरल पोस्ट सात वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील त्यांच्या परिवर्तन रॅलीतील आहे. व्हायरल दावा खोटा, दिशाभूल करणारा आहे.