PM Modi Assam Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काझीरंगा येथे रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटे ५ वाजता ते तेथील प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. यावेळी त्यांनी हत्तीवरून जंगल सफारीचा आनंद घेतला आणि जीप राइडमधून निसर्गसौंदर्यही न्याहाळले.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवरून जंगल सफारी केली. त्यानंतर त्यांनी त्याच रेंजमध्ये जीप राइडचाही आनंद लुटला. इतकेच नाही, तर डोक्यावर कॅप अन् हातात कॅमेरा घेत, त्यांनी जंगलात फोटोग्राफीही केली. पंतप्रधानांसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वनाधिकारीही होते. डोक्यावर काळी टोपी, प्रिंटेड पँड, टी-शर्ट आणि ऑफ व्हाईट शूज यासह एका काळे स्लीव्हलेस जॅकेट, डोळ्यावर गॅगल अन् हातात कॅमेरा अशा लूकमध्ये मोदी दिसत आहे.
पंतप्रधान मोदी काझीरंगा येथे पोहोचण्यापूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय काझीरंगा उद्यान फिरतानाही त्यांच्याबरोबर अनेक सुरक्षा रक्षक तैनात होते. ते काझीरंगा नॅशलन पार्कमध्ये जवळपास दोन तास थांबले होते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पंतप्रधान मोदींची ही पहिलीच भेट आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ व्हॉलर’चे उद्घाटन
पंतप्रधान मोदी आसाम दौऱ्याच्या दुसरी दिवशी जोरहाटमधील प्रसिद्ध अहोम जनरल लचित बोरफुकन यांच्या १२५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’चे उद्घाटन करतील.
आसामला देणार १८ हजार कोटींच्या प्रकल्पांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यादरम्यान आसाममधील १८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच येथे ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.