PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून पंतप्रधान आज नाशिकच्या पवित्र भूमीत आले होते. महाराष्ट्रात अनेक विकास कामांच लोकार्पण ते करणार आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली व त्यानंतर त्यांनी काळाराम मंदीराकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी तेथे गणपतीची व रामांची आरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळाराम मंदिरात त्यांना संस्यानच्या वतिने रामांची मुर्ती भेट म्हणुन देण्यात आली. त्यानंतर मोदी रामांच्या भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळाले. त्यांचा हाच भजन करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही वारकऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी किर्तनात तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. मोदींनी हातात टाळ घेऊन याठिकाणी भजन केले. काहीवेळ भजन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी रवाना झाले. नाशिकमध्ये युवा महोत्सवास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार आणि प्रात्यक्षिके सादर केली आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये येताच नरेंद्र मोदींनी तेथे रोडशो केला, त्यावेळी त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सभेला संबोधित करुन पंतप्रधान मोदी मुंबई कडे रवाना होतील. तेथे ते अटल सेतु म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतुचे उद्घाटन करणार आहेत.
पाहाा व्हिडीओ
हेही वाचा >> पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादा गटाला होर्डिंगवर मानाचे स्थान
पंतप्रधान आज नाशिकच्या पवित्र भूमीत आले आहेत. जगभरात मोदींच्या नावाचा गौरव होतोय. मोदी है तो मुमकिन है, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. तसेच त्यांचा हा भजनाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.