Viral Video : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. एआय, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर, हवामान बदल, शिक्षण, आरोग्य इत्यादी विषयांवर सखोल चर्चा केली. या दरम्यान टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे ही भारतीय संस्कृती असल्याचे मोदी म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी जे जॅकेट घातले आहे ते टिकाऊ पद्धतीने बनवले आहे. सध्या या जॅकेटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सगळीकडे या जॅकेटचे फोटो व्हायरल होत आहे. तुम्हाला माहिती आहे का हे जॅकेट कशापासून तयार केले आहे? पंतप्रधान मोदी या जॅकेटविषयी काय म्हणाले, चला तर जाणून घेऊ या.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी अनेक विषयावर चर्चा केली. यावेळी मोदींनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले जॅकेट परिधान केले होते. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की त्यांनी जे जॅकेट परिधान केले आहे त्यामध्ये ३० ते ४० टक्के टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या आणि टेलर जेव्हा एखादा कापड कापतो त्यानंतर उरलेल्या कापडांपासून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आणि त्याचा पुन्हा वापर करणे, हा भारतीय लोकांचा स्वभाव आहे.
हेही वाचा : Video : भर बाजारात “दोसो.. दोसो…” च्या तालावर डान्स करत विकले कपडे, तरुणांची मार्केटिंग ट्रिक पाहिली का?
मोदींचे जॅकेट
सध्या या जॅकेटची सगळीकडे चर्चा सुरू आहे. मोदी यांनी मुलाखतीदरम्यान पांढऱ्या कुर्तीवर घातलेले हे हाफ निळ्या रंगाचे जॅकेट खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होते. हे जॅकेट पाहून कोणालाही वाटणार नाही की हे टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची ही पद्धत अनेकांना आवडली आहे. सोशल मीडियावर अनेक जण मोदींचे कौतुक करताना दिसत आहे.
याशिवाय अनेक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केली. एआय संदर्भात त्यांची मिश्किल टिप्पणी सुद्धा चर्चेचा विषय ठरली. नरेंद्र मोदी म्हणाले, “एआयचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आमच्या देशात अनेक राज्यांमध्ये मातेला आई म्हणतात. जेव्हा आमच्याकडे मूल जन्माला येते तेव्हा ते आई म्हणते आणि एआई म्हणते” पुढे ते म्हणाले, “एआयचा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात व्हायला हवा.”