पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्रिमंडळातल्या बदलामुळे तर चर्चेत आहेतच पण पंतप्रधानांची अजून एक गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. ती म्हणजे त्यांचं नवं ट्विट. या ट्विटमध्ये त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याही भन्नाट शैलीत!

पंतप्रधानांनी Dextro असं नाव असलेल्या ट्विटर हँडलच्या युजरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा तुम्ही म्हणता तसं डेक्स्ट्रोदिवस! तुमचं इथून पुढचं वर्ष आनंदात जावं.
आता अनेकांना प्रश्न पडला आहे की पंतप्रधानांनी या व्यक्तील वाढदिवसाच्या शुभेच्छा का दिल्या? पंतप्रधानांनी दखल घ्यावी अशी ही व्यक्ती आहे तरी कोण? पण जरा खोलात जाऊ तपासलं असता, काही गोष्टी आमच्या हाती लागल्या आहेत.


Dextro या व्यक्तीला अजित दत्ता नामक एका प्रोफाईलवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावर Dextro ने अजितला उत्तर दिलं, धन्यवाद. डेक्स्ट्रोदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सांग मला शुभेच्छा द्यायला कारण ते तुला फॉलो करतात. ह्याच ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे प्रोफाइल एका डॉक्टरचं आहे असं डिस्क्रीप्शनवरुन आणि तिच्या ट्विटर हॅण्डलवरील नावावरुन समजतं. या नावातही तिने DextrodCardic1 असं लिहिलं आहे. अजित दत्ताने शुभेच्छा दिल्या त्यावर तिने रिप्लाय केलेला की मोदी तुला फॉलो करतात तर त्यांना पण मला शुभेच्छा द्यायला सांग या डेक्स्ट्रो दिवसाच्या.

अजित दत्ता हा उजव्या विचारसरणीचा सोशल इन्फ्ल्युएन्सर आहे जो ‘द फस्ट्रेटेड इंडियन’शी संबंधित होता. आता तो पॉण्डेचेरी लिटरेचर फेस्टीव्हलचं काम बघतो. ‘द फस्ट्रेटेड इंडियन’ ही उजव्या विचारसरणीच्या बातम्या देणारी साईट आहे. त्याच कारणाने मोदी या अजितला फॉलो करतात. पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला फॉलो केलं आहे याचा स्क्रिनशॉटही त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पिन केला आहे.

Story img Loader