जी-२० देशांच्या नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रोमला पोहोचले. यावेळी त्यांचे भारतीय समाजातील लोकांनी जोरदार स्वागत केले. इतकेच नाही तर भारतीय समुदायातील लोकांनी शिव तांडव स्तोत्र गायले आणि ओम नमः शिवाय चा जयघोष केला. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शिव तांडव स्तोत्र वाचेपर्यंत हात जोडून उभे आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लोक मोदी-मोदीचा नारा देताना दिसत आहेत. इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमणे हे एक मनोरंजक दृश्य होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली. बागची यांनी लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी रोममध्ये पोहोचले, जिथे त्यांचे या प्राचीन शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान ते अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चेचा भाग असतील. यशस्वी दौऱ्याची अपेक्षा.”

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थायी विकास, हवामान बदल, जागतिक आर्थिक आणि आरोग्य पुनर्प्राप्ती यासारख्या मुद्द्यांवर जागतिक नेत्यांशी चर्चा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर इटली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि भारताचे राजदूत यांनी स्वागत केले.

दौऱ्यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यापूर्वी दिलेल्या माहितीत सांगितले होते की, जागतिक अर्थव्यवस्था सुधारणे आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांवर ते रोममध्ये बोलणार आहेत. एवढेच नाही तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप यांचीही भेट घेणार आहेत.या भेटीदरम्यान ते व्हॅटिकन सिटीलाही भेट देतील आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ आहे. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ते रोममध्ये असतील. यानंतर ते ग्लासगो येथे हवामान बदलावरील शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी जाणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm rome visit pms shivtandav welcome in rome airport video goes viral ttg