पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ग्लासगो येथील एका हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी तेथील उपस्थितांनी ‘मोदी है भारत का गेहना’ असं गात एकदम जल्लोष त्याचं स्वागत केलं. COP26 हवामान समीट परिषदेत भाग घेण्यासाठी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी पंतप्रधान दोन दिवसीय युनायटेड किंगडम दौऱ्यावर आहेत.
इटलीतील जी २० समीट परिषदेतून ग्लासगो येथील हॉटेलमध्ये पोहोचताच पंतप्रधान मोदींचे स्कॉटिश बॅगपाइप्सच्या आवाजात स्वागत करण्यात आले, त्यानंतर भारतीय डायस्पोराच्या प्रतिनिधींकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या. पंतप्रधानांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायातील मुलाशीही संवाद साधला.
( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )
२६वी यु एन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (COP26) इटलीच्या भागीदारीत युनायटेड किंगडमद्वारे आयोजित केली जात आहे. समीट परिषद ३१ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि १२ नोव्हेंबर रोजी संपेल. जागतिक नेत्यांची शिखर परिषद (WLS), COP26 चा उच्च-स्तरीय विभाग १-२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परिषदेत १२० हून अधिक देशांचे प्रतिनिधीत्व होणार आहे.
समुदायाचे नेते आणि स्कॉटलंड-आधारित इंडोलॉजिस्ट यांच्याशी झालेल्या बैठकीमुळे सोमवारी पंतप्रधानांच्या युरोपीय दौऱ्याच्या यूके लीगची सुरुवात होईल. पुढे, ते ग्लासगो येथील स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस (SEC) येथे संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या २६ व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP26) मध्ये WLS च्या पूर्ण सत्राला संबोधित करतील.
( हे ही वाचा: PM Rome Visit : रोममध्ये पंतप्रधानांचं शिवतांडव स्तोत्रानं झालं स्वागत! विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल! )
आजच्या उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान मोदी बोरिस जॉन्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. जॉन्सनच्या मते, शिखर परिषद “जगातील सत्याचा क्षण” असेल.