Police Arrested Thief : चोरी करताना आपल्याला कुणीही पाहू नये, यासाठी चोरांच्या डोक्यात भन्नाट कप्लना येत असतात. तोंडाला मास्क लावून चोरांनी बॅंकेत किंवा घरात दरोडा टाकल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पण एका चोराने तोंडाला मास्क लावण्यासाठी महिलेची अंतर्वस्त्र वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे अंतवस्त्र मास्क म्हणून वापरणाऱ्या चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमेरिकेतील ओक्लाहोमा परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना सिक्योरिटी कॅमेराक कैद झाली आहे. घरात घुसून पॅकेजेसची चोरी करण्याचा दरोडेखोराचा प्रयत्न तुलसा पोलिसांनी हाणून पाडला.
चोरीच्या घटनेची खबर मिळताच पोलीस थेट घरात घुसले अन्….
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मागे घडलेल्या चोरीच्या काही घटनांमध्ये याच चोराचा हात असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व्यक्त केला. अशाप्रकारच्या चोरीच्या घटनांमध्येही महिलेचं अंतर्वस्त्र मास्क म्हणून घालण्याच प्रकार उघडकीस आल्यची माहिती पोलिसांनी दिलीय. चोरीच्या घटनेबाबत खबर मिळताच, पोलिसांनी तुलसा येथे असलेल्या एका घरातील दरवाजा उघडला. त्यानंतर पोलिसांनी घरात स्पेंसर नावाचा चोर घुसल्याचं पाहिलं. पोलिसांना पाहताच स्पेंसरने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिसांनी तपास सुरु केल्यावर सर्च वॉरंटबद्दलही त्या चोराने विचारणा केली.
पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर स्पेंसरला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर शनिवारी जामीन मिळाल्यावर आरोपी स्पेंसरची सुटका करण्यात आली .चोरीच्या या धक्कादायक घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. चोराने मास्क लावण्यासाठी महिलेची अंतर्वस्त्र वापरण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण स्पेंसर नावाच्या चोराला गजाआड करण्यात तुलसा पोलिसांना यश आल्यानं स्थानिक नागरिकांकडून पोलिसांचं कौतुकही केलं जात आहे.