आजकाल वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. शिवाय अशा पार्ट्यांदरम्यान अनेकजण कारच्या छतावर बसून दंगा करतानाचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या अशाच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी प्रिन्स दीक्षित या यूट्यूबरला अटक केली आहे. दीक्षितने त्याच्या वाढदिवशी मित्रांसह रस्त्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दीक्षितचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पांडव नगरजवळील राष्ट्रीय महामार्ग-२४ वर काही तरुण कारच्या छतावर उभे राहिल्याचं दिसत आहेत. यावेळी त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओतील मुलांच्या कृत्याचा अनेकांनी निषेध केला होता. त्यामुळे अखेर यूट्यूबर दीक्षितला वाहतूक नियमांचे उल्लघण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली.

हेही पाहा- रस्त्यावरील खोदकामामुळे गॅस गळती, किचनमध्ये गॅस शिरल्याने घर उद्धवस्त; धक्कादायक घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

हेही पाहा- ट्रेनमध्ये मुलीबरोबर प्रवास करत होता गोंडस कुत्रा, रेल्वेमंत्र्यांनीही शेअर केला Video; म्हणाले “भारतीय…”

गुरुवारी दिल्ली पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं. त्यामध्ये म्हटलं आहे की, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेच्या माहिती मिळवण्यासाठी आम्ही चौकशी करत असून, दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक गाड्या हायवेवरुन जाताना दिसत आहेत. यावेळी दीक्षितचे अनेक अनेक मित्र गाड्यांच्या खिडकीत उभं राहिल्याचं दिसत आहेत. त्यामुळे व्हिडीओतील मुलांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.

यूट्यूबरचे स्पष्टीकरणं –

दरम्यान, या सर्व प्रकरणावर प्रिन्सने सांगितलं की, हा व्हिडिओ १६ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हणजेच त्याच्या वाढदिवशीचा असून तो NH24 वरून शकरपूरला जाताना कारच्या छतावर उभा राहून शूट करण्यात आला होता. त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते. शिवाय आपण YouTube फॉलोअर्सना असे वागू नका, असं आवाहन केले होतं असं प्रिन्सने म्हटलं आहे. याबाबतची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested youtuber prince dixit after a video of his birthday party on the roof of a car went viral jap
Show comments