लहानपणी आपण सर्वांनीच चोर-पोलीस हा खेळ आवर्जून खेळाला असेल. चोर आणि पोलीस यांच्यावर आधारित अनेक चित्रपटही येऊन गेले आहेत. परंतु वास्तविक जीवनात असे प्रसंग फार कमीच पाहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका पोलिसाने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये चोराला पकडले आहे. ही घटना मंगळुरु शहरात घडली आहे. एक पोलीस कर्मचारी चोर हाती लागेपर्यंत त्याच्या मागे धावत राहिला. शहरातील गल्लोगल्ल्यांमधून पाठलाग केल्यानंतर अखेरीस पोलिसाने मोबाईल फोन चोरणाऱ्या चोराला पकडले.

ही घटना बुधवारी १२ जानेवारीला घडली. नेहरू मैदान परिसरात काही चोरटे एका व्यक्तीचा फोने चोरून फरार झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु लगेचच पोलिसांनी आपली सूत्रे फिरवत या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील एक पोलीस अधिकारी कारमधून उतरून सिंघम स्टाईलमध्ये चोराचा पाठलाग करू लागला. हिंमत न हरता हा पोलीस अधिकारी त्या चोराच्या मागे धावत राहिला. अरुंद गल्ल्या, रस्त्यांवर पाठलाग करून अखेरीस पोलिसाने त्या चोरट्याला पकडलेच. त्याने चोरट्याला जमिनीवर पाडले आणि त्याच्यावर बसला. थोड्याच वेळात अधिकाऱ्याचे सहकारी तिथे पोहचले आणि त्या चोरट्याला तिथून घेऊन गेले. ही पूर्ण घटना पाहिल्यानंतर आपण एखाद्या चित्रपटाचा सीन पाहत आहोत असे वाटेल परंतु हे सगळं वास्तवात घडलेलं आहे. या पोलीस अधिकाऱ्याने या चोराला पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे

हेही वाचा : ‘या’ अवतारात प्रियकर पोहचला प्रेयसीच्या लग्नात; पकडला गेल्यानंतर झाले ‘हे’ हाल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याच्या अन्य दोन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसाने फिल्मी स्टाईलमध्ये चोराचा केलेला पाठलाग हा मंगळुरु शहरात सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अनेक लोक या पोलिसाच्या धाडसी वृत्तीची प्रशंसा करत आहेत.

Story img Loader