एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे. कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने काही महिलांनी थेट कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार केली. तसंच मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या या कुत्र्याविरोधात कारवाई करा अशीही मागणी केली.

नेमकी कुठे घडली आहे ही घटना?

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत असं दिसतं आहे की मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर कुत्र्याने फाडलं. एका भिंतीवर हे पोस्ट होतं जे कुत्र्याने फाडलं. त्यानंतर या कुत्र्याच्या विरोधात विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

मीडिया रिपोर्ट्स नुसार स्वतःला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या दसारी उदयश्री यांनी उपहासात्मक पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे. काही महिलांना घेऊन त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना सांगितलं की व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्ट फाडतो आहे त्यामुळे त्या कुत्र्याच्या विरोधात कारवाई करा.

उदयश्री यांनी माध्यमांना हे सांगितलं की जगनमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष १५१ जागा जिंकून सत्तेवर आला आहे. अशा मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडून कुत्र्याने त्यांचा अपमान केला आहे. राज्याच्या सहा कोटी लोकांचा या कुत्र्याने अपमान केला आहे. आम्ही पोलिसात या भटक्या कुत्र्याविरोधात तक्रार दिली आहे तसंच पोलिसांना हेदेखील सांगितलं आहे की लवकरात लवकर या कुत्र्याला जेरबंद करा कारण आमच्या राज्याच्या प्रिय मुख्यमंत्र्यांचा या कुत्र्याने अमपान केला आहे.

Story img Loader