Police Dance In Vitthal Wari: पंढरीची वारी ही महाराष्ट्राची, देशाची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती आहे. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून, फुगडी खेळत अनेकजण सहभागी होतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील आहे. यंदाही लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पोलिसांसाठी तो बंदोबस्त नसतो, पांडुरंगाची सेवा असते!

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

दरम्यान या वारीत महाराष्ट्र पोलीस.. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. उन्हातान्हात, पाणी-पावसात, वादळ-वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. त्यात आषाढी एकादशी म्हटले तर, डोळ्यासमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी! भक्तीचा उत्सव, या वारीला सर्व ठिकाणाहून लाखो वारकरी येत असतात. या यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखून नियोजनबद्ध वारी पार पडण्याचे मोठे काम हे पोलीस करत असतात. पोलिसांसाठी पंढरीच्या वारीचा तो बंदोबस्त नसतो, तर ती पांडुरंगाची सेवा असते. अशावेळी विठूनामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत पोलीसही हरिनामात दंग होतात. असाच एक साताऱ्यातील पोलिसांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार ते पाच पोलीस एवढ्या गर्दीत कर्तव्यासोबतच वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या हरिनामात दंग झाले आहेत. उन्हातानात वारकरी चालत चालत पंढरपूरकडे जात आहे अशावेळी वारकऱ्यांसोबत पोलीसही वारीत तल्लीन झाल्याचं बघायला मिळत आहे. या पोलिसांना पाहून वारकऱ्यांचा सगळा थकवा दूर झाला आहे, पोलिसांना पाहून वारकऱ्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. दरम्यान आता,  सगळ्या वारकऱ्यांना विठुरायाची आस लागली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नाशिक स्टेशनवर विदर्भ एक्सप्रेस आली मात्र थांबण्याआधीच महिलेला घाई नडली; थरारक अपघाताचा VIDEO समोर

हा व्हिडीओ @Pritampurohit31 या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमिताने १० ते १२ लाख भाविक पंढरपूरात येत असतात. वारीत सहभागी झालेले लोक ७०० किलोमीटर चालत येत असतात. अशावेळी वारकऱ्यांसोबत पाणीव्यवस्था, आरोग्यासाठी रुग्णवाहिका, राहण्यासाठी लागणारे तंबू असणारी गाडी, अशी अनेक वाहने असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जवळपास २८०० वाहने येत असतात. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीत १५०० वाहने येत असतात. अशा वाहनांना पासेस उपलब्ध करून दिले जातात. सार्वजनिक व्यवस्थेवर ताण येऊ नये. यासाठी २ महिने आधीच योग्य नियोजन केले जाते.