Wari police video: महाराष्ट्र पोलीस.. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. उन्हातान्हात, पाणी-पावसात, वादळ-वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. त्यात आषाढी एकादशी म्हटले तर, डोळ्यासमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी! भक्तीचा उत्सव, या वारीला सर्व ठिकाणाहून लाखो वारकरी येत असतात. या यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखून नियोजनबद्ध वारी पार पडण्याचे मोठे काम हे पोलीस करत असतात. पोलिसांसाठी पंढरीच्या वारीचा तो बंदोबस्त नसतो, तर ती पांडुरंगाची सेवा असते. अशावेळी विठूनामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत पोलीसही हरिनामात दंग होतात. असाच एक पोलिसांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन पोलीस वढ्या गर्दीत कर्तव्यासोबतच वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या हरिनामात दंग झाले आहेत. उन्हातानात वारकरी चालत चालत पंढरपूरकडे जात आहे अशावेळी वारकऱ्यांसोबत पोलीसही वारीत तल्लीन झाल्याचं बघायला मिळत आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, हे कडवं या व्हिडीओला लावण्यात आलं आहे. याच प्रमाणे हे दोन पोलीस वारीत दंग झाले आहेत. या पोलिसांना पाहून वारकऱ्यांचा सगळा थकवा दूर झाला आहे, पोलिसांना पाहून वारकऱ्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. दरम्यान आता, सगळ्या वारकऱ्यांना विठुरायाची आस लागली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ७९ वर्षांनंतर भरली आठवणींची शाळा! १९५४ च्या बॅचचा गेट टुगेदरचा Video पाहून तुम्हालाही आठवतील सोनेरी दिवस
हा व्हिडीओ @rohit raghunath borude या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमिताने १० ते १२ लाख भाविक पंढरपूरात येत असतात. वारीत सहभागी झालेले लोक ७०० किलोमीटर चालत येत असतात. अशावेळी वारकऱ्यांसोबत पाणीव्यवस्था, आरोग्यासाठी रुग्णवाहिका, राहण्यासाठी लागणारे तंबू असणारी गाडी, अशी अनेक वाहने असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जवळपास २८०० वाहने येत असतात. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीत १५०० वाहने येत असतात. अशा वाहनांना पासेस उपलब्ध करून दिले जातात. सार्वजनिक व्यवस्थेवर ताण येऊ नये. यासाठी २ महिने आधीच योग्य नियोजन केले जाते.