Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही पोलिस कर्मचारी तुफान डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ गणेशोत्सवादरम्यानचा असू शकतो जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला काही पोलिस कर्मचारी दिसेल. काही पोलिस कर्मचारी नाचताना दिसत आहे. चंद्रा या मराठी लोकप्रिय गाण्यावर हे सर्व डान्स करत आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोलिस कर्मचाऱ्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : फाटलेली जीन्स कशी तयार केली जाते? जीन्सचा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेंड; व्हिडीओ होतोय व्हायरल
गणेशोत्सवादरम्यान पोलिसांचा जागोजागी मोठा बंदोबस्त ठेवला जातो. गणेशोत्सव सुखरुप पार पडावा, या हेतूने पोलिस दिवस रात्र राबत असतात. pphpenchalaiah या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” काही युजरने हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.