गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहेत. नेटकरी आणि अनेक सेलिब्रिटी सुद्धा या गाण्यावर रील्स बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आहेत. तर यामध्ये पोलीस तरी मागे कसे राहतील? आपण पोलिसांना गुन्हेगारांना पकडताना पाहतो. पण तुम्ही कधी पोलिसांना नाचताना पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात पोलीस कर्मचारी आपल्या गणवेशातच या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कच्चा बादाम’नंतर ‘कच्चा अमरुद’ची क्रेझ; पेरूवाल्या काकांचं हे Viral गाणं ऐकलंत का?

पोलिसांवरही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरलेले नाही. पोलिसांचा डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘कच्चा बादाम’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच आवडेल.

Viral Video : हा घोडा घेतोय पोहण्याची मजा; व्हिडीओ बघून नेटकरी मात्र झाले हैराण

Viral Video : तुम्ही कधी मगरीला हसताना बघितलं आहे का? नसेल, तर हा व्हिडीओ बघाच

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हे पाच पोलीस कर्मचारी एका रांगेत उभे राहून या गाण्यावर डान्स करत आहेत. यामध्ये एक महिला कर्मचारी सुद्धा आहे. या पाच कर्मचाऱ्यांमध्ये केवळ महिला कर्मचारी एकटीच बरोबर डान्स करत आहे.

हे पाचही कर्मचारी केवळ काही सेकंद डान्स करतात आणि हसू लागतात. हा मजेदार व्हिडीओ preetigoswami555 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून या व्हिडीओला २५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.