Viral video: कुत्रा हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. माणसांनाही मदत करायला तो सदैव तत्पर असतो. या कारणास्तव, तो माणसांचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. पण जेव्हा कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाते, तेव्हा तो अधिक मदतीसाठी तयार होतो. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या ट्रेनरला CPR देताना दिसत आहे. CPR म्हणजेच CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा त्याला CPR दिला जातो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की एखादा प्राणी इतका बुद्धिमान असू शकतो!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कुत्रा आपल्या ट्रेनरला मदत करताना दिसत आहे. व्हिडिओबद्दल सांगण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की त्यातील व्यक्तीला प्रत्यक्षात चक्कर आलेली नाही. उलट, तो चक्कर आल्याचे नाटक करत आहे, जेणेकरून कुत्रा सीपीआर देऊ शकेल. तुम्ही आजपर्यंत अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये श्वान आपल्या मालकाकडे वर्तमानपत्र, चेंडू किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊन जात असतात. पण या व्हिडिओमध्ये कुत्रा एखाद्या व्यक्तीला CPR देत असल्याचं तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – TOMATO: टोमॅटोचे दर वाढल्याने आईने दुबईवरुन मागवले १० किलो टोमॅटो, मुलीनेही सुटकेस भरून पाठवले भारतात…

CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा त्याला CPR दिला जातो. व्यक्तीची छाती दोन्ही हातांनी दाबली जाते आणि त्याला तोंडावाटे श्वास दिला जातो. कुत्राही असेच करताना दिसत आहे. पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून बेशुद्ध झाल्याचे नाटक करतो. मग कुत्रा धावत येतो आणि दोन्ही पायांनी त्या व्यक्तीवर उड्या मारू लागतो. तो पोटावर आणि छातीवर उडी मारतो. यानंतर, तो त्याच्या डोक्याला मानेला स्पर्श करून श्वास तपासण्याचा प्रयत्न करतो.

अलीकडेच @_B___S या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader