रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहत्या वाहतूकसंख्येबरोबर वाहतूक नियोजन देखील महत्त्वाचे ठरते आहे. शहरामध्ये चौका चौकांमध्ये वाहतूक पोलिस दिवस रात्र वाहतूकीचे नियोजन करताना दिसतात. उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा….वाहतूक पोलिस नेहमीच त्यांचे कर्तव्य पार पाडतात. सध्या असाच एक वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलिस भरपावसात वाहतूक नियोजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा वाहतूक पोलिस कर्मचारी डान्स करत करत वाहतूकीचे नियोजन करत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील व्यक्ती चौकाच्या मधोमध उभा आहे. धोधो पाऊस कोसळत असतानाही हा कर्मचारी आपले कर्तव्य पूर्ण करत आहे. एवढंच नाही तर पावासामध्ये भिजण्याचा आनंद घेण्याबरोबर डान्स देखील करत आहे. डान्स करत वाहतूकीचे नियोजन करत आहे. हा व्यक्ती आपले काम आनंदाने कसे करावे याचा संदेश देत आहे.

Robbery at industrial company in Nalasopara security guard was ambushed and theft of 14 lakhs
नालासोपार्‍यातील औद्योगिक कंपनीवर दरोडा, सुरक्षा रक्षकाला डांबून १४ लाखांचा ऐवज लुटला
Bareli Home Guard Controls Traffic With His Unique Dance Moves
बरेलीच्या रस्त्यावर होम गार्ड डान्स स्टेप्सच्या मदतीने करतोय वाहतूक नियंत्रण, VIDEO एकदा पाहाच
Shortage of rickshaws in Thane city after the onset of monsoon
ठाणे : पावसाळा सुरु होताच प्रवाशांचे हाल सुरु; शहरात रिक्षांचा तुटवडा
Loksatta anvyarth Two wheeler taxi rules Private transport system
अन्वयार्थ: दोनचाकी ‘टॅक्सी’ला हवा नियमांचा ब्रेक…
Arrival of Saint Nivrittinath palanquin in the city change in traffic route
संत निवृत्तीनाथ पालखीचे शहरात आगमन, वाहतूक मार्गात बदल
Highway Traffic Management System on Pune-Mumbai Expressway to curb unruly traffic
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला आता सुधारणांचे ‘वळण’
Global brand of home tidiness Welspun Group
माझा पोर्टफोलियो – घराच्या नेटकेपणाची जागतिक नाममुद्रा
RBI
कोटक महिंद्र बँकेला विमा कंपनीतील हिस्सा झुरिच इन्शुरन्सला विकण्यास रिझर्व्ह बँकेची मंजुरी

हा व्हिडीओ इंदौरमधील असल्याचे पोस्टच्या कॅप्शनवरून समजते. रणजित सिंह नावाच्या वाहतूक पोलिस अधिकऱ्याचे thecop146 नावाने इंस्टाग्राम हँडल आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, इंदौरमध्ये पहिला पाऊस पडला आणि मी छत्री आणयाला विसरलो. मज्जा आली पावसात भिजून. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा मी हरवून जातो.” व्हिडीओ २१ जून रोजी पोस्ट केला आहे. बरं झालं छत्री आणायला विसरलो नाहीतर पावसात भिजण्याचा आनंद घेता आला नसता. असा मजकूर व्हिडीओवर लिहिलेला दिसत आहे.

पावसात भिजणाऱ्या या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले की, “आपल्या ड्युटीसाठी संपूर्ण समर्पण भाव दिसतो. सल्यूट सर” इंदौरमध्ये पहिल्या तारखेचा पावसाचे स्वागत करताना सर” तिसऱ्याने लिहिले की, ड्युटीबरोबर पावसाचा आनंद घेत आहे. तुमच्यासारख्या लोकांना ड्युटी करताना पाहून खूप आनंद होतो सर” चौथ्याने लिहिले, सर तुमच्यासारखे वाहतूक पोलिस विभागात कोणीही नसेल” पाचवा लिहिले, “पहिला व्यक्ती पाहिला जो आपली नोकरी आनंदाने करतो आहे”