Traffic police video: तुमच्यापैकी जवळपास सर्वांनाच वाहतुकीचे नियम माहीत असतील. तुम्ही वाहन चालवताना त्यापैकी एक जरी नियम मोडला, तरी वाहतूक पोलिस चलान कापतात. काही घटनांमध्ये तर लायसन्स रद्द केले जाते. त्यात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतात की नाही याची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते. हल्ली वाहतूक पोलिस गल्लीबोळात रस्त्यांवर उभे राहून वाहनचालकांना शिस्तीचे धडे देताना दिसतात. मात्र तरीही काही जण हेल्मेट घालत नाहीत किंवा वाहतूकीचे नियम सर्रास तोडताना दिसतात. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगी नंबर नसलेली स्कूटर चालवत असून तिनं हेल्मेटही घातलेल नाहीये. मात्र यानंतर वाहतूक पोलिसांनी जे केलं ते पाहण्यासारखं आहे.

वाहतूक पोलिसांनी व्हिडिओ बनवला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कूटर चालवत असून तिला वाहतूक पोलिसांनी अडवले आहे. मुलीच्या स्कूटरवर नंबर प्लेट नाही. त्यावर पापा गिफ्ट लिहिलेले दिसत आहे. यानंतर पोलीस येऊन मुलीला सांगतात. ‘तुझे नाव आहे का?’ यानंतर मुलगी म्हणाली, ‘मला कोणतीही मुलाखत द्यायची नाही.’ यानंतर पोलीस कर्मचारी मुलीला वाहतुकीचे नियम समजावून सांगतो आणि तिला सांगतो की आता तिला मोठा दंड आकारला जाणार आहे. यावेळी हॉस्पिटलमधून आल्याचं तरुणी पोलिसांना सांगते मात्र यावर पोलीस सांगतात की, तुम्ही कुठूनही आलात, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली तरी तुमच्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही नंबर नसलेले वाहनही चालवत आहात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>वडिलांचा संघर्ष कुणाला दिसत नाही; मुंबई लोकलमध्ये खाली बसून डबा खाणाऱ्या वडिलांचा VIDEO व्हायरल

इन्स्टाग्रामवर @11_on_foot नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता खूप व्हायरल होत आहे. त्यावर लोक भरभरून कमेंट्स करीत आहेत. तर असे अनेक लोक आहेत; जे या व्हिडीओला शेअर आणि लाइक करीत आहेत.

Story img Loader