Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील तरुणानं असं काही केलंय की तुम्हीही डोक्याला हात माराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकालच्या बहुतांश तरुणांचं पहिलं प्रेम म्हणजे झोप. वेब सीरिज, चित्रपट किंवा इतर मनोरंजनाच्या माध्यमांनी तरुणाईला इतकी भुरळ घातली आहे की, हाती घेतलेलं काम तडीस नेल्याशिवाय झोपणार नाही असा निश्चय काही जण करतात. मग ही मंडळी रात्ररात्र जागरण करतात. कधी नाइट आऊटमुळे तर कधी एक्स्ट्रा कामाच्या व्यापामुळे झोपायला उशीर होतो आणि सर्वसामान्य लोकांच्या गुड मॉर्निंगच्या वेळी या तरुणांची गुड नाइट होते. अनेकदा झोप अशी लागते की व्यक्ती जिंवत आहे की नाही हे समजणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्या एक व्यक्ती चक्क नदीतील पाण्यात झोपून जातो मात्र असा झोपतो की घटनास्थळी पोलिस आणि अन्य नागरिक भितीने जमा होतात.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नदी सारखा परिसर दिसत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो व्यक्ती मृत असल्याचे वाटल्याने काही व्यक्ती पाण्यात उतरुन त्याच्या बॉडीला बाहेर काढण्यासाठी जातात मात्र त्याला उचलताच तो व्यक्ती जागा होतो. खरं तर तो पाण्यात झोपला होता मात्र ही झोपण्याची पद्धत त्या व्यक्तीची वेगळीच होती. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तरुणाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्यात त्यानं हात झटकला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने आश्चर्यचकित होऊन विचारलं आहे “की हे कसं काय शक्य आहे?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video viral on social media srk