Police and Delivery Boy Viral Video: पोलिसांच्या शूरत्वाचे किस्से आपण अनेकदा ऐकतोच. पोलिस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता, आपलं काम चोख बजावत असतात. त्यांची ड्युटी म्हणजे २४ तासच असते, असं म्हणायला काही हरकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून चोरी, दरोडा अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गुन्हे रोखण्यासह राज्यात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीदेखील पोलिसांवर असते. या सगळ्यात पोलीस नेहमीच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या प्रयत्नात असतात.
सोशल मीडियावर पोलिसांचे असे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. परंतु, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला पोलिसांचा अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाने एका डिलिव्हरी बॉयची ज्या प्रकारे मदत केली ती पाहून सगळेच कौतुक करतील.
…अन् पोलिसांनी केली मदत
सोशल मीडियावर व्हायरल झालेला डिलिव्हरी बॉय आणि पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपली स्कूटर घेऊन चालत चालत डिलिव्हरीसाठी जाताना दिसतोय. तेवढ्यात अचानक मागून पोलिसांची बाईक येते. पोलीस बाईक थांबवतात आणि त्याला विचारतात की नेमकं काय झालंय.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/reel/DC1-Gn_yAQy/?igsh=MTFvaTI5ZWJodzB0ZA%3D%3D
भरउन्हात थकलेल्या डिलिव्हरी बॉयची विचारपूस करून झाल्यावर त्यांना कळतं की, त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलंय. हे कळताच पोलीस त्याला मदत करतात आणि त्याच्या गाडीत पेट्रोल भरून देतात. तसंच त्याला पाण्याची बाटली देऊन पाणी प्यायला सांगतात, तसंच त्याला खाण्यासाठी त्यांच्याजवळ असलेला एक बिस्कीटचा पुडादेखील देतात. डिलीव्हरी बॉय त्यांचे आभार मानून गाडीवर बसून तिथून निघून जातो. हा व्हिडीओ पाहून पोलीस कर्तव्यासह त्यांच्यातली माणुसकीही जपतात हे कळून येतं.
हेही वाचा… जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त
हा व्हायरल व्हिडीओ @heart_touchinghub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पोलिसांनी तर मनच जिंकल” . तर दुसऱ्याने “पोलिसांसाठी आदर” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत लिहिलं, “देव तुमचे भले करो सर”