Viral Video : पोलीस हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. गावात किंवा शहरात सुव्यवस्था राखणे, हे पोलीसांचे मुख्य काम आहे. पोलीस २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर राहतात. अनेकदा जबाबदारीमुळे ते कुटुंबाला सुद्धा वेळ देऊ शकत नाही. त्यांना अनेक आनंदा मिळणाऱ्या गोष्टींना मुकावे लागते. सध्या सोशल मीडियाच्या जगात अनेक पोलीस बांधव वेळ मिळेल तसा स्वत:चे मनोरंजन करताना दिसतात. कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी गाण्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. जबाबादारीतून थोडा वेळ मोकळा श्वास घेत आवड जपताना दिसतात. (police man made reel with other colleagues and won heart of netizens watch viral video)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या सहकाऱ्याबरोबर ही रील बनवली आहे. ही रील पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इतर पोलीस सहकारी सुद्धा या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आनंद लुटताना दिसत आहे.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel

हा व्हायरल व्हिडीओ एका बसमधील आहे. या बसमध्ये पोलीस बांधव बसलेले दिसत आहे. त्यातील एक पोलीस अधिकारी जागेवरून उठतो आणि ” दुनिया में रहना है तो काम कर प्यारे हाथ जोड सबको सलाम कर प्यारे” गाण्याचे लिरीक्स गाताना दिसतो. तो इतर सहकाऱ्यांना टाळ्या वाजवण्यास सांगतो. इतर सहकारी पोलीस सुद्धा प्रोत्साहन देत टाळ्या वाजवताना दिसतात. या पोलीस अधिकाऱ्याबरोबर गाण्याचा आनंद लुटताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

javedjewale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणी इतकं प्रेमळ कसं असू शकतं.” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मन खूश झाले” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडून तुम्हाला जय हिंद जय भारत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा पोलीस बांधवाचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Story img Loader