दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी पोलिस सर्वसामान्यांना दंड आकारत असतात. परंतु, ही जनजागृती फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, आपल्यासाठी नाही असे समजून काही पोलिस कर्मचारी दुचाकी चालवताना हेल्मेट घालत नाहीत. पोलिसच जर नियम तोडत असतील तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेलच. तुमच्या याच प्रश्नाला योग्य उत्तर मिळवून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एक पोलिसासोबत जे केलं ते पाहून तुम्ही दुसऱया पोलिसाचं कौतुक कराल हे नक्की.
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, या उक्तीचा प्रत्यय या व्हायरल व्हिडीओमधून दिसून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पोलिस वर्दीत असताना विना हेल्मेट प्रवास करत होता. इतक्यात तिथल्या एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने हे पाहिलं आणि त्याला जागीच रंगेहाथ पकडलं. पोलिसांची वर्दी परिधान केलेली असताना कायद्याचं उल्लंघन केलेलं पाहून हे वरिष्ठ पोलिस अधिकारी खूप चिडतात. वरीष्ठ अधिकरी चिडलेले पाहून हा पोलिस अधिकारी जागीच थांबतो आणि घाबरतो.
आणखी वाचा : कार एका खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात VIRAL VIDEO : बाळाला पाठीवर घेऊन महिला सफाई कामगार करतेय ड्यूटी, याला जिद्द म्हणावे की मजबुरी?गेली, पाहा हा मजेदार VIRAL VIDEO
वरीष्ठ पोलिस अधिकारी त्याच्या जवळ जातात आणि त्याला चांगली अद्दल घडवतात. हेल्मेट का घातलं नाही असं त्या पोलिसाला विचारतात. इतकंच काय तर त्या पोलिसाने वर्दीचाही अपमान करत गळ्याभोवती रूमाल गुंडाळला होता. हे पाहून तर त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. यापुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : बाबो! एका सिंहीणीसाठी दोन सिंह आपआपसात भिडले, पण दोघांच्या भांडणात सिंहीण पसार…पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाळाला पाठीवर घेऊन महिला सफाई कामगार करतेय ड्यूटी, याला जिद्द म्हणावे की मजबुरी?
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने या बेशिस्त पोलिसाला कशी अद्दल घडवली हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं असेलच. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ gieddeandgieddee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हेल्मेटसक्तीची जनजागृती फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, आपल्यासाठी नाही असा समज बाळगणाऱ्या व्जनतेसाठी हा व्हिडीओ एक उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. काही युजर्स या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचं कौतुक करत आहेत, तर काही युजर्स या व्हिडीओचा आनंद घेत आहेत.