Viral Video : सोशल मीडिया हे कला सादर करण्याचे एक उत्तम माध्यम ठरत आहे. अनेक जण सोशल मीडियावर त्यांची कला सादर करतात. कोणी गाणी म्हणताना दिसतात तर कोणी डान्स करताना दिसतात. कोणी मिमिक्री करताना दिसतात तर कोणी स्केच काढताना दिसतात. यावरील अनेक व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी सुंदर गाणं गाताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्याच्या गाण्यावर साडे सहा लाखांहून अधिक लाईक्स आहेत. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (police officer sings a amazing song in a beautiful voice video goes viral on social media)
पोलीस अधिकाऱ्यानं गायलं गोड आवाजात सुरेख गाणं
पोलीस हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. शहरात किंवा गावात सुव्यवस्था राखणे, हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. ते जनतेच्या रक्षणासाठी २४ तास काम करतात अनेकदा त्यांना त्यांच्या कुटुंबाला सुद्धा वेळ देता येत नाही. सहसा पोलीसांना आपण अत्यंत शिस्तीमध्ये आणि गंभीर स्वभावात बघतो पण एखाद्या पोलीस निवांत बसून सुंदर गाणं गात असेल तर ते ऐकायला कोणाला आवडणार नाही? सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक पोलीस अधिकारी पायऱ्यांवर बसून सुंदर गाणं म्हणताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हे अप्रतिम गाणं ऐकून काही लोक त्याचे चाहते होईल. या पोलीस अधिकार्याचे नाव निशांत मिश्रा असून उत्तरप्रदेशमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
sub_inspector_nishantmishra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर किती सुंदर आवाज. पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं” तर एका युजरने लिहिलेय, “तुमच्या आवाजात खूप सादगी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्यांच्या वर्दी प्रमाणे त्यांचा आवाज सुद्धा खूप आकर्षित करणारा आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.