आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला आहे, रेल्वेचा प्रवास म्हटलं की जेवढी रेल्वेच्या आतमध्ये गर्दी असते तेवढीच प्लॅटफॉर्मवरही असते. शिवाय रेल्वे जर ठराविक वेळेपेक्षा उशिरा येणार असेल तर अनेकजण प्लॅटफॉर्मवरती झोपतात. प्रवासी प्लॅटफॉर्मवर झोपल्यामुळे इतर प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होते याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण झोपलेल्या प्रवाशांना उठवण्याची, त्यांना जागं करण्याची काही पद्धत असते. पण सध्या पुणे रेल्वे स्थानकातील एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हो कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांने प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना अशा पद्धतीने जागं करण्याचा प्रयत्न केला आहे, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या काही लोकांच्या अंगावर एक पोलीस बाटलीतील पाणी ओतताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ @rupen_chowdhury नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक रेल्वे पोलिस कर्मचारी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर पाणी ओतताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये, “RIP माणुसकी. पुणे रेल्वे स्टेशन,” असं लिहिलं आहे.

हेही पाहा- वाघाच्या काळजाचा शेतकरी! गायीचा जीव वाचवण्यासाठी ‘तो’ थेट सिहींणीशी भिडला, थरारक Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचं म्हटलं आहे. पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), इंदू दुबे यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे, त्यांनी ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटलं आहे. शिवाय प्लॅटफॉर्मवर झोपल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते हे मान्य आहे, परंतु ज्या पद्धतीने लोकांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला आहे, ते योग्य नसून संबंधित कर्मचार्‍यांना प्रवाशांशी सन्मानाने, आणि सभ्यतेने वागण्याचा सल्ला दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या आणि संतापजनक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने, हे अतिशय लज्जास्पद कृत्य असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने पोलिसाच्या कृत्याचा निषेध केला आहे. @AhirRamjibhai नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने थेट रेल्वे मंत्र्याना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

तर काही नेटकऱ्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न विचारत पोलीस कर्मचाऱ्याच्या कृतीचं समर्थनदेखील केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police poured water on people sleeping on the platform of pune railway station netizens got angry after seeing that video jap
Show comments