भारतात पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्य माणसांना तर या महागाईच्या काळात गाडी चालवणं कठीण झालं आहे. त्यामुळे भारतीय यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. यासंबंधीत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाने केलेला जुगाड पाहून पोलीसही चक्रावले. बुलेट चालवायची म्हटलं तर त्याला खूप पेट्रोल लागतं. त्यामुळे या तरुणाने इंधन परवडत नसल्याने बुलेटमधील इंजिनचं काढलं आणि त्या जागी सायकलचे पायंडल लावले. हेल्मेट नसल्यामुळे पोलिसांनी या तरुणाला अडवलं पण याने तर त्याची चक्क सायकल बनवली. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
ही नक्की बुलेट आहे की सायकल?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावर बुलेट चालवत आहे. तितक्यात त्याने हेल्मेट न घातल्याने पोलीस त्याला पकडतात. पण जेव्हा पोलिस त्याच्या बुलेटला नीट पाहतात तेव्हा तेही चक्रावतात. कारण या तरुणाने बुलेट मधील इंजिन काढून चक्क सायकलचे पायंडल लावलं होतं. नियमानुसार सायकलवर हेल्मेट घालण्याची गरज नसते. त्यामुळे त्याच्याकडून दंड तरी कसा आकारायचा असा प्रश्न पोलिसांनाच पडला.
अजब जुगाड पाहून पोलीसही चक्रावले
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @shuaib0007 या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या तरुणाने बुलेटसोबत केलेला हा अजब जुगाड पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. तर ही भन्नाट आयडिया पाहून अनेकांनी या बाईकचं कौतुकही केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले असून शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे.