देशात आणि जगात हातचलाखीने लुबाडणूक करणाऱ्या चोरांची कमतरता नाही. अनेकदा असे दिसून येते की, परदेशातील नागरिकांना विविध देशांतील सार्वजनिक वाहतुकीचे भाडे किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीबद्दल योग्य माहिती नसते. अशा वेळी तेथील काही सार्वजनिक वाहनचालक किंवा दुकानदार या पर्यटकांची फसवणूक करतात. अशाच प्रकारे एक बांगलादेशी ब्लॉगर जोडपे भारतातील बंगळुरूला भेट देण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत जे काही घडले ते फारच विचित्र होते. एका रिक्षाचालकाने त्यांची हातचलाखीने आर्थिक फसवणूक केली; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या जोडप्याबरोबर जे घडले ते कॅमेऱ्यात कैद झाले नसते, तर फसवणूक सिद्ध करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे जवळजवळ अशक्य झाले असते. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये हे जोडपे ब्लॉगिंगसाठी बंगळुरूला पोहोचले असून, त्यांनी संपूर्ण प्रवासात आपल्याबरोबर आणलेला कॅमेरा ऑन ठेवल्याचे दिसत आहे. बंगळुरूमध्ये रिक्षामधून उतरतानाही त्यांच्याकडील कॅमेरा ऑन होता; पण कदाचित रिक्षाचालकाला त्याची भणक लागली नाही.

Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
farewell given by son to father on their last day working message written behind truck video going viral
VIDEO: ड्रायव्हर बापाला नोकरीच्या शेवटच्या दिवशी मुलानं दिला सुंदर निरोप; गाडीच्या मागे काय लिहलं एकदा पाहाच
Viral video of girls fighting in a class and a boy angrily hits the bench
“एकमेकींच्या जीवावरच उठतील”, भरवर्गात दोन मुलींचं भांडण सुरू असताना मुलाचा राग अनावर, पुढच्याच क्षणी त्याने जे काही केलं ते भयंकर
Delhi: Elderly Man Robbed At Knife Point By Bike-Borne Thieves On Pretext Of Asking Directions In Vivek Vihar
चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; वृद्ध व्यक्तीबरोबर भर दिवसा काय घडलं पाहा; VIDEO पाहून गोंधळून जाल
Viral Video Shows Traffic Police has stopped a Baby Girl
VIRAL VIDEO : लायसन्स कुठे आहे? आजोबा-नातीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, दंड मागताच पाहा चिमुकलीने काय केलं
cute brother sister video
“माझ्या भावाला मारलंस ना तर…” चिमुकलीने आईशी कचाकचा भांडत दिली धमकी; VIDEO तील निरागसपणा पाहून युजर्स म्हणाले…
Father daughter vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“एका बापाची घालमेल” लेकीची पाठवणी करताना वडील धायमोकलून रडले; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी

बोलत असताना केली हातचलाखी

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे जोडपे रिक्षाचालकाला ५०० रुपयांची नोट देते आणि उरलेले पैसे परत देईल याची वाट पाहत उभे असते. त्यादरम्यान रिक्षाचालक त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहतो आणि अत्यंत चलाखीने तो ५०० रुपयांची नोट आपल्या स्लीव्हमध्ये लपवतो आणि १०० रुपयांची नोट हातात घेतो. यावेळी तो त्या प्रवाशांनी केवळ १०० रुपयांची नोट दिल्यासारखे भासवतो. या जोडप्यातील एक जण रिक्षा चालकाला विचारतो की, अरे मी किती दिले? त्यावर रिक्षाचालक १०० रुपयांची नोट दाखवतो. त्यानंतर ते जोडपे १००रुपयांची नोट परत घेते आणि नंतर पुन्हा ५०० रुपयांची नोट देते.

अत्यंत चालाखीने लुटले दुप्पट पैसे

रिक्षाचालक अतिशय हुशारीने प्रवासी दाम्पत्याकडून दुप्पट पैसे घेतो. या जोडप्याने नंतर व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर सदाशिवनगर वाहतूक पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची ओळख पटवून त्याला पकडले असून, त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

‘भावा हा तर प्रोफेशनल चोर आहे…’

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या. एका युजरने लिहिले की, भावा हा तर प्रोफेशनल चोर निघाला. दुसर्‍या एकाने लिहिले की, तो नक्कीच जादूगार आहे. त्याने किती लोकांची अशी फसवणूक केली असेल याचे आश्चर्य वाटते. त्यावर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, त्याचा मुख्य व्यवसाय लूट करणे आहे, असे दिसते.