मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. पावसाळ्यात मरिन ड्राइव्हच्या कठड्याला धडकणाऱ्या काही फुटांच्या लाटा असो किंवा वानखेडेवर भारताने मिळवलेला विश्वचषक सर्वच गोष्टींचा हा जगप्रसिद्ध कट्टा साक्षीदार आहे. बरं अनेकांसाठी हा हक्काचा कट्टा आहे. म्हणजे अगदी कॉलेज बंक मारण्यापासून ते मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांपर्यंत आणि ऑफिसला जाणाऱ्यांपासून ते फक्त मरिन ड्राइव्ह बघायला आलेल्यांपर्यंत अनेकजण एकाचवेळी येथे सापडतात.असाच एक मरिन ड्राइव्हवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवा असं सांगूनही तरुणाई हे एकताना दिसत नाही. तरुण वर्गातील सेल्फीची हौस अनेकदा प्राणघातक ठरत असल्याच्या घटना उजेडात आल्यानंतरही याचे गांभीर्य तरुण-तरुणींना नसते. मरिन ड्राईव्हवर उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अशाच एका तरुणाला मुंबई पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण कट्ट्यावरुन खाली उतरत थेट दगडांवर पोहचला आहे. त्याची ही मस्ती पोलिसांनी पाहिली आणि तरुणाला पकडलं. यावेळी पोलिसांनी हे असले प्रकार पुन्हा करु नये म्हणून त्याला शिक्षा दिली. या तरुणाला पोलिसांनी पुशअप्स काढायला लावले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं! शेतकरी वडिलांना मुलानं गिफ्ट केला स्मार्ट फोन, VIDEO पाहून डोळे पाणावतील

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @yogesh_shankopal_since_1997 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.