Police Viral Video : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने लाच म्हणून अशी गोष्ट मागितली की वाचून कोणालाही हसू आवरणे अवघड होईल. या प्रकरणातील संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यावर लाचखोरीप्रकरणी कारवाई केल्यावर मंत्र्यांनीही त्याचे कौतुक केले. तसेच संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण आता काही पैशांसाठी अधिकाऱ्याचा अर्धा पगारही कापला जाईल. नोकरीवरून काढून टाकण्याची पुढील कारवाईदेखील होऊ शकते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पण, सोशल मीडियावर लोक या प्रकरणाची जोरदार चर्चा करीत आहेत. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक जळजळीत प्रतिक्रिया देत आहेत; तर काही जण खिल्ली उडवत आहेत. हे प्रकरण कन्नौजमधील सौरीख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापुन्ना बहावलपूर चौकीचे आहे. जिथे चौकीचे प्रभारी राम कृपाल केस मिटविण्यासाठी एका व्यक्तीकडून पाच किलो बटाटे लाच म्हणून मागताना दिसले. ऑडिओमध्ये दुसरी व्यक्ती दोन किलो बटाटे देण्यास सहमती दर्शवते; पण पोलीस अधिकारी ते मान्य करीत नाही. त्यानंतर तीन किलो बटाट्यांवर हे प्रकरण मिटले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्या तपासातून बटाट्यांच्या पलीकडे आणखीही काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!
Transgender actress Shubhi Sharma
तृतीयपंथी अभिनेत्रीचा झाला अपघात; दुचाकी चालकाने दिली धडक, पोलिसांनी केली मदत
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

कन्नौजचे एसपी अमित कुमार आनंद यांना व्हायरल झालेल्या ऑडिओची माहिती मिळताच त्यांनी चौकीच्या प्रभारीला तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सीओ सदर कमलेश कुमार या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोप खरे ठरल्यास चौकीच्या प्रभारीला नोकरी गमवावी लागू शकते. एसपीच्या मते, बटाटा हा शब्द कोडवर्ड म्हणून वापरला गेला असावा. आरोपी अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई करण्यात येत आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी सोशल मीडियावर संबंधित प्रकरणातील दोषी व्यक्तीवर केलेल्या कारवाईबद्दल एसपी अधिकाऱ्याचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणाला भ्रष्टाचारावरील हल्ला असल्याचे म्हणत त्यांनी लिहिले आहे की, एसपी सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.

Story img Loader