एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ लोकांना जागरूकही करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. उत्तर प्रदेशातील एका शहरात एक भाजीविक्रेता अनोख्या पद्धतीने भाजी विकताना दिसून आला. अनोखी स्टाईल पाहून लोक मोठ्या संख्येने थांबून भाजी विक्रेत्याकडे बघत आहेत. त्याला पाहून हसताना देखील दिसत आहेत.
या व्हिडीओमधला भाजी विक्रेता दररोजप्रमाणे हातगाडीवर भाजी घेऊन आला आहे. मग त्याला वाटेत दोन व्यक्ती भेटतात, जे म्हणतात की पोलिस पुढे उभे आहेत. चलन कापत आहेत. त्यासाठी हेल्मेट घाला असं म्हणताना त्याने ऐकलं. त्या दोन व्यक्तींनी दुचाकीस्वारांना सल्ला दिला असावा. त्याचवेळी हे भाजी विक्रेत्याने सुद्धा ऐकलं. जर आपणही हेल्मेट घालून गेलो नाही तर त्याचेही चालानही कापले जाईल असा विचार या भोळ्या भाजी विक्रेत्याने केला.
मग या भाजी विक्रेत्याने हेल्मेट घालून भाजी विकायला सुरूवात केली. जेव्हा तो भर मार्केट परिसरात जातो तेव्हा लोक त्या भाजी विक्रेत्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. त्याचवेळी गस्तीवर तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने भाजी विक्रेत्याला थांबवून हेल्मेट घालण्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना भाजी विक्रेत्याने सांगितले की, त्याला कोणीतरी सल्ला दिला की पोलीस पुढे उभे आहेत. हेल्मेट न घातल्यास चलन कापले जाईल. हे ऐकून पोलीस अधिकाऱ्याने भाजी विक्रेत्याला सांगितले की, टू व्हिलर आणि फोर व्हिलर यांना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तुमच्याकडे चारचाकी आहे, पण ती हातगाडी आहे. त्यामुळे तुम्हाला हेल्मेटची गरज नाही. तुम्ही रस्त्याच्या कडेलाच भाजी विकता. हे ऐकून आजूबाजूचे लोक हसू लागले.
आणखी वाचा : आजी-आजोबांच्या नावाचा काढला टॅटू, पाहून त्यांची काय प्रतिक्रिया होती, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : भरधाव ट्रकने गेंडयाला धडक दिली, ट्रक चालक पसार, पाहा धक्कादायक घटनेचा VIRAL VIDEO
भागवत प्रसाद पांडे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “घाबरू नका.. जागरुकता हवी..!”. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला १४ हजार लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स भाजी विक्रेत्याच्या भोळेपणाचं कौतुक करत आहेत.