केरळ पोलिसांचे लज्जास्पद कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला वारंवार लाथा मारत बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येतोय. हा व्हिडीओ पाहून राज्य पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येतेय. एका प्रवाशाने हा २० सेकंदाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. रेल्वेच्या डब्यात दरवाजाजवळ बसलेल्या एका व्यक्तीला पोलिस कर्मचारी वारंवार लाथा मारल्यानंतर तो व्यक्ती पोलिसासमोर गुडघ्यावर बसलेला दिसून येत आहेत. ही घटना रविवारी घडलेली असून मावेली एक्स्प्रेस ट्रेनमधला हा प्रकार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये दिसणारा पोलिस कर्मचारी एएसआय आहे. तो आणि दुसरा पोलीस कन्नूरहून ट्रेनमध्ये चढला आणि प्रवाशांची तिकिटे तपासू लागला. तिकीट नसल्याच्या संशयावरून त्यांनी पीडित व्यक्तीला मारहाण केली आणि तो दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. वडकारा येथे त्याला ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं. कन्नूरचे पोलीस अधीक्षक पी. एलांगोवन यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल विशेष शाखेच्या एएसपीकडून मागवण्यात आला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बुरखा घालून मुलगा बाकावर बसला, शेजारी बसलेल्या मुलीसोबत त्याने जे केलं ते पाहून हादरून जाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! इतकी गर्दी… ‘या’ भागातला करोना पळाला का?

दोन दिवसांपूर्वीच केरळ पोलिसांच्या पथकाने एका परदेशी नागरिकाला नवीन वर्षाच्या उत्सवासाठी सरकारी दारूच्या दुकानातून विकत घेतलेल्या दारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यास भाग पाडले होते. या घटनेचा सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परदेशी नागरिकाशी संबंधित या प्रकरणी राज्य सरकारने शनिवारी एका पोलिसाला निलंबित केलं.

आणखी वाचा : तुम्ही कधी ‘मस्का चहा’ची चव चाखलीय का? Butter Tea चा VIRAL VIDEO पाहून टी लवर्सना आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहू लोक आता व्हिडीओमधील रेल्वे कर्मचारी आणि तिथे उभ्या असलेल्या इतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मावेली एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार थांबवण्याऐवजी केवळ तमाशा बघत असलेल्या पोलिसांना सुद्धा टीटीईला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policeman was kicking person traveling without a ticket from the moving train video of cruelty went viral prp