Fact Check: भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचार, मेळावे, मोर्चे यांच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे झाले असून तिसऱ्या टप्प्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. यादरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेपाळच्या संसदेचा असून, इथे कन्नौजचे काँग्रेस आमदार जगतसिंह नेगी भाषण करत आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत, असा दावा कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे. तर आमच्या तपासातून काय समोर आलं जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे दावा?

@SaleemK20853076 एक्स (ट्विटर) युजरने व्हायरल व्हिडीओ प्रोफाइलवर शेअर केला आहे व कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘नेपाळच्या संसदेत नेपाळचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जे काही बोलले आहेत, हे उद्या किंवा मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी प्रत्येक भारतीयाने हा व्हिडीओ जरूर पाहावा’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा…

https://web.archive.org/web/20240430074032/https://twitter.com/SaleemK20853076/status/1784831208083595692

इतर वापरकर्तेदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चने आम्हाला एका फेसबुक प्रोफाईलवर नेले, जेथे हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा…

<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?

व्हिडीओचे टायटल हिंदीमध्ये होते की, ‘किन्नौर से काँग्रेस आमदार जगतसिंह नेगीसे देश के महान व यशस्वी प्रधानमंत्री के बारे में सुनिए…’ म्हणजेच ‘देशाच्या महान आणि यशस्वी पंतप्रधानांबद्दल किन्नौरचे काँग्रेस आमदार जगतसिंह नेगी काय म्हणत आहेत ऐका…’

तर तपासानुसार २१ मार्च २०२१ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-हिमाचल प्रदेशच्या फेसबुक प्रोफाइलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. काँग्रेस आमदार जगतसिंह नेगी हे हिमाचल प्रदेशचे फलोत्पादन मंत्री आहेत. तीन वर्षांपूर्वी न्यूज एमएक्स टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला हा व्हिडीओही आम्हाला आढळला.

तीन वर्षांपूर्वी लाइव्ह टाइम्स टीव्ही हिमाचलच्या यूट्यूब चॅनेलनेही हा व्हिडीओ प्रसारित केला होता.

निष्कर्ष : काँग्रेसचे आमदार जगतसिंह नेगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, असे सांगून हा व्हिडीओ व्हायरल होत होता; मात्र हा दावा खोटा निघाला. हा व्हिडीओ नेपाळच्या संसदेतील नाही, तर हा व्हिडीओ जुना असून तो हिमाचल प्रदेश विधानसभेचा आहे.