एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी २ वाजता सुरू होईल. दोन्ही संघ २० वर्षांनी आज दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत समोरासमोर येणार आहेत. २००३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना त्यांच्यामध्ये झाला होता. म्हणूनच हा सामना भारतीय चाहत्यांसाठी आणखी खास ठरतो आहे.

आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार शिखा शर्मा यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देत खास रांगोळी काढली आहे. पॉलीकॅब इंडियाने आपल्या ‘चीअर फॉर इंडिया’ या मोहिमेद्वारे इंदूरमधील शिखा शर्मासोबत एकत्र येऊन विश्वचषक स्पर्धेसाठी १३ हजार चौरस फुटांची रांगोळी काढली आहे. एका अरुंद मैदानात ही रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळीमध्ये मैदान काढून, त्यात मधोमध ट्रॉफीचे चित्र रेखाटण्यात आले आहे आणि बाजूला फलंदाजी करणारा एक खेळाडू चित्रित करण्यात आला आहे. विश्वचषक स्पर्धेनिमित्त पॉलीकॅब इंडिया आणि रांगोळी कलाकार यांनी भारतीय संघासाठी काढलेली ही खास रांगोळी एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
about writer filmmaker pritish nandy life journey
व्यक्तिवेध : प्रीतीश नंदी
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Flag hoisting held on January 26 on islands and forts of Konkan
कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार

हेही वाचा…World Cup 2023’च्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा; Google ने बनवले खास डूडल! एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा :

१३ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी :

रांगोळीत काढलेल्या ट्रॉफीवर फेटा काढला आहे; जो देशाच्या तिरंग्यातील रंगांनी सजवला आहे. तसेच ट्रॉफी आणि फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या चित्राखाली लाल किल्ला, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल या प्रसिद्ध स्मारकांचे चित्रसुद्धा रांगोळीत रेखाटले आहे; जे अगदीच सुंदर आहे. जितो वर्ल्ड कप वन मोअर (Jeeto World Cup One More) असे रांगोळीच्या वर इंग्रजी अक्षरांत लिहिण्यात आले आहे आणि अशा खास पद्धतीने भारतीय संघाला शुभेच्छा देणारी १३ हजार चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे.

भव्य रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळी कलाकार शिखा शर्माचे औक्षण केले.त्यानंतर पॉलीकॅब इंडियाचे सदस्य आणि शिखा शर्मा यांनी मिळून रांगोळी काढण्यास सुरुवात केली आणि दिवस-रात्र रांगोळीतील बारीकसारीक गोष्टी अगदीच मेहनतीने चित्रित करण्यात आल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ रांगोळी कलाकार शिखा शर्मा यांच्या @shikha.s_art या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘२० वर्षानंतर रेकॉर्ड बनवणार इंडिया’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. एकूणच या विश्वचषक स्पर्धेसाठी सगळेच खूप उत्सुक आहेत आणि भारतीय संघाला विविध माध्यमांतून शुभेच्छा देताना दिसून आले आहेत.

Story img Loader