सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज पोस्ट होत असतात. व्हायरल होत असतात. पण त्यातील काही मोजकेच व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लहान मुलीचा आहे. केवळ पैशांसाठी या लहान मुलीने हिरवी मिरची खात असल्याचा दावा या व्हिडीओमधून करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला. त्यानंतर आता या व्हिडीओमागचं एक सत्य समोर आलंय.

गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडू शकते. पैशाच्या हव्यासापोटी माणूस स्वत:चं नुकसान करू शकतो, हेच सांगणारा या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. गरीबीचे चटके सोसत काही चिमुकल्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे पडत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. नेमका असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये मुलगी हिरवी मिरची खात असल्याचं दिसून येत आहे. कधी कधी जेवण करताना मिरची चावली की तोडांची कशी आग होते, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मग विचार करा ही लहान मुलगी हिरवी मिरची खात असताना तिची काय अवस्था होत असेल. परंतू तिच्या चेहऱ्यावर मिरची खाताना कोणत्याच भीतीचे हावभाव दिसून येत नव्हते. अगदी आनंदाने ती मिरची खाताना दिसून आली.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Anand Mahindra Wife And Daughters details in marathi
उद्योगपती आनंद महिंद्रांची पत्नी कोण आहेत? त्यांना नेमकी किती मुलं? त्यांचे शिक्षण अन् त्या काय करतात जाणून घ्या

आणखी वाचा : ‘या’ अमेरिकेन पठ्ठ्यानं ‘रिंकिया के पापा’ भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIRAL VIDEO

चेहऱ्यावर हसण्याचे भाव दाखवत ही चिमुकली मिरची खात असली तरी तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. पण मिरची किती तिखट असते याची कल्पना असताना सुद्धा ही लहान मुलगी मिरची का खात आहे, ? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. ही मुलगी आवड आहे म्हणून नाही, कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचाच म्हणून नाही, तर चक्क पैशांसाठी ही मुलगी मिरची खात असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर ती हात वर करत आपल्या हातातील पैसे दाखवताना दिसली. मिरची खाऊन दाखवल्यानंतर तिला हे पैसे मिळाले आहेत, असं हा व्हिडीओ पाहून वाटू लागतं.

आणखी वाचा : बाप रे! महाकाय अजगर खांद्यावर घेऊन तो फिरवू लागला, VIRAL VIDEO पाहून तुम्हाला ही बसेल धक्का!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घोडा रडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. केवळ पैशांची गरज आहे म्हणून या मुलीने तिखट मिरची खाल्ली, डोळ्यात पाणी येत होतं तरीही या मुलीने हार मानली नाही, असं हा व्हिडीओ पाहून वाटू लागत. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मागचं एक सत्य समोर आलं आहे.

हा व्हिडीओ २०२० मधला असून यातली मुलग ७-८ वर्षांची आहे. ही मुलगी जमिनीवर बसलेली आहे. तिचे अंगावरील कपडेही जुने दिसत आहेत, त्यामुळे ती गरीब असल्याचा अंदाज लोकांना आला. मुलगी एकामागून एक अनेक हिरव्या मिरच्या खाताना दिसत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : OMG! मार्केटमध्ये शॉपिंग करताना अचानक साप दिसला आणि…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

काय आहे व्हिडीओमागचं सत्य ?
आता या व्हिडीओचं सत्य काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आपल्याला माहित आहे की आपण सोशल मीडियावर जे काही पाहतो ते एकतर खोटं किंवा अर्धसत्य असतं. अशा स्थितीत या व्हिडिओमध्ये करण्यात येत असलेला दावा कितपत खरा आहे, याचा शोध घेणं आवश्यक आहे. ‘वर्ल्ड ऑफ बझ’ नावाच्या वेबसाइटवर या व्हिडीओबाबत एक खुलासा करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, मुलीच्या कथित काकांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता, या व्हिडिओचं स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, लहान मुलगी हिरवी मिरची खात असलेला व्हिडिओ केवळ एक विनोद होता. त्यात कोणतंही तथ्य नव्हते. अहमद फराज नावाच्या व्यक्तीने सांगितले की, लोकांनी इतक्या लवकर या व्हिडीओबाबत तर्क लावू नये. यासोबतच त्यांनी मुलीचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लहान मुलगी सुंदर आणि स्वच्छ कपडे परिधान केलेले दिसून येत आहे.

आणखी वाचा : ‘योद्धा जन्माला येत नाही तर…तो घडत असतो!’ भारतीय जवानाचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणाल!

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईने दुकानदाराला दिले पैसे, एका दिवसात ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

या व्हिडीओमागचं सत्य समोर आल्यानंतर सुद्धा अनेक लोकांनी यावर टिका सुरूच ठेवली होती. मुलीच्या व्हिडीओसोबत केलेला दावा खोटा असला, तरी इतक्या लहान मुलीला एवढ्या हिरव्या मिरच्या खाऊ घालणे तिच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, अशा कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत. लहान मुलीसोबतच्या अशा विनोदांवर लोकांनी सोशल मीडियावर त्या व्यक्तीला चांगलंच फटकारलं आहे.

Story img Loader