आवडते अन्नपदार्थ खाण्याचा मोह आपल्याला अनेकदा अनावर होतो. अशावेळी डाएट, आरोग्य, त्या डिशची किंमत अशा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता फक्त त्या खाद्यपदार्थाचा मनमुराद आस्वाद घेतला जातो. अशीच आवडता पदार्थ खाण्याची इच्छा जर एखाद्या गरीब व्यक्तीला झाली तर? पैसे नसल्यामुळे कदाचित प्रत्येकवेळी त्यांचा आवडते खाद्यपदार्थ खाण्याचा विचार फक्त विचारच राहत असेल. नोएडामधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य कुमार या ट्विटर युजरने ट्वीट केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी एक गरीब लहान मुलगी तिच्याजवळ असलेले १० रुपये घेऊन ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खायला गेली, बर्गर किती रुपयांना मिळतो हे तिला कदाचित माहीत नसाव. तिने एका बर्गरची ऑर्डर दिली, पण तो बर्गर ९० रुपयांचा होता. यावरून त्या मुलीला ओरडून तिथून जायला सांगणे सहज शक्य होते, पण असे न करता तिथल्या कर्मचाऱ्याने उरलेले पैसे स्वतःच्या खिशातून भरून, या मुलीची बर्गर खाण्याची इच्छा पुर्ण केली. विशेष गोष्ट म्हणजे ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा केला जातो. म्हणजे त्या दिवसाला साजेसे कार्य तिथल्या कर्मचाऱ्याने केले.

Viral Video : ऊसाने भरलेला ट्रक हत्तींनी रस्त्यात थांबवला अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच

व्हायरल ट्वीट :

‘बर्गर किंग’ने देखील या घटनेची दखल घेत, या गरीब मुलीची मदत करणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. या कर्मचाऱ्याचे नाव धीरज कुमार असून, ते नोएडा येथील बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशन रेस्टॉरंट ब्रांचमध्ये काम करतात. त्यांच्या या दयाळूपणाचे कौतुक करत टीमकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला. याचे फोटो देखील ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

Viral Video : शेतातील टोमॅटो गाडीत भरण्याची ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले ‘ऑलिम्पिक स्पर्धेत..’

‘बर्गर किंग’चे ट्वीट :

या घटनेमुळे आपल्या आजुबाजूला असणाऱ्या गरजु व्यक्तींना मदत केली पाहिले, अशी प्रेरणा अनेकांना मिळाली आहे.