इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी संपूर्ण भारतात तितक्याच आवडीने खाल्ली जाते. सकाळाचा नाष्टा म्हणून अनेक लोक इडली खाण्यास पसंती देतात. देशाच्या प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये तुम्हाला विक्रेते इडली चटणी किंवा इडली सांबार प्रत्येक प्लेट १० ते २० रुपयांना विकताना दिसतील. तुम्ही चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला तरी इडली सांबारसाठी तुम्हाला प्रत्येकी १०० ते १५० रुपये खर्च करावे लागतात पण हीच इडली ५०० रुपयांना प्रति प्लेट विकत घ्यावी लागली तर? आता तुम्हाला प्रश्न पडेल पण ५०० रुपयांना का विकेल? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चेन्नईमधील लोकप्रिय रेस्टॉरंट प्रति प्लेट ५०० रुपयांमध्ये इडली विकत आहे.

या लोकप्रिय रेस्टॉरंट डॉक्टरांनी तयार केलेली इडली लाँच केली आहे. एका निवेदनानुसार, अद्यार आनंद भवन (A2B) ने “पोषणातील क्रांती” घडवणारी इडली लाँच केली आहे, जी “तुमचे आरोग्य जपण्यासाठी काळजीपूर्वक तयार केली गेली आहे”,

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, त्यांनी लिहिले: “A2B’s ५०० रुपयांची इडलीमध्ये ब्ल्यूबेरीज, साल काढलेले भिजवलेले बदाम, ऑलिव्ह ऑईल, केशर, बटर करी आणि काही चिरलेली कोथिंबीर यासह इडली यांचा समावेश आहे”

ऑलिव्ह ऑईल, ब्लूबेरी, फ्लॅक्ससीड्स, बदाम, शिताके मशरूम अर्क (Shiitake mushroom extract) आणि अश्वगंधा यांसारख्या घटकांसह बनवलेली ही इडली “७२ बायोमार्कर्सने मंजूर केली आहे आणि ही इडली पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, जे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देते” असेही निवेदनात म्हटले आहे.

यात पुढे असेही लिहिले आहे की, “नवीन जीवनसत्व समृद्ध इडली मधुमेहींसाठी अनुकूल आहे आणि ” रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केली आहे. “यात कोणतेही बियांचे तेल नाही त्यामुळे ही इडली एक आरोग्यदायी पर्याय ठरते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आयात केलेल्या ब्लूबेरींना चव आणखी वाढवतात. ही इडली ते सर्व वयोगटांसाठी निरोगी ठरते. “मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे,”

एका वापरकर्त्याने लिहिले की, “आम्ही या इडलीशिवाय सर्वकाही करू शकतो. फक्त तुमच्या फायद्यासाठी लोकांना मूर्ख बनवू नका. तथाकथित फूड ब्लॉगर्सना पैसे देऊन तुम्ही कोणतीही टाकाऊ वस्तू विकू शकत नाही”. दुसऱ्याने कमेंट केली की “हे खूप जास्त होत आहे. ब्लूबेरी आणि बदामासह ५०० रुपयांची इडली; किती वाईट कॉम्बो आहे.”

हेही वाचा – कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

अशा पदार्थांची गरज समजून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेला माहिती देताना पुण्यातील खराडी येथील मदरहुड हॉस्पिटलच्या सल्लागार- आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ, वर्षा कृष्णा गाडे यांनी सांगितले की, तुमच्या आहारावर प्रयोग न केलेलेच बरे. “त्याऐवजी, नियमित जेवण घ्या ज्यात कोशिंबीर, डाळ, पोळी, भाजी किंवा भाताचा थोडासा भाग असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि जे एखाद्यासाठी कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही,” असे डॉ गाडे यांनी सांगितले.

हेही वाचा – Health Special: पावसाळ्यात थंडी असूनही हिवाळ्याप्रमाणे भूक का लागत नाही?

“तुम्हाला निरोगी राहण्यासाठी एका विशिष्ट अन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा चांगल्या खाण्याच्या सवयी लावा आणि अधिक शाश्वत जीवनशैली जगणे चांगले.”, असेही त्यांनी सांगितले.