Khawa malpuas recipe for durga puja 2024: शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. अशात अनेकजण नवरात्रीचे ९ दिवस उपवास करतात.अशावेळी देवीसाठीही नैवेद्याला गोड पदार्थ आपण करतो. असाच एक नैवैद्याचा पदार्थ सध्या गुगल ट्रेंडवर आहे. हा पदार्थ आहे मालपुआ. अनेकांना गोड खायला आवडतं. देशातील फेमस गोड पदार्थांपैकी एक म्हणजे मालपुवा. मालपुवा अनेकांची आवडती डिश असते. मालपुवामध्ये अनेक प्रकार आहे पण आज आपण खव्याचा मालपुवा कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. ही रेसिपी चवीला टेस्टी असून तुम्ही खालील स्टेप्स फॉलो केल्यास अगदी चविष्ट असा पदार्थ तुम्हाला खायला मिळेल. चला तर मग बाजारासारखा टेस्टी मालपुआ कसा बनवायचा पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लुसलुशीत मालपुआ साहित्य

२ कप गव्हाचे पीठ
वेलदोड्याचा थोडा कुट
किसलेले खोबरे
२५० ग्रॅम साखर
अर्धी लीटर दूध

लुसलुशीत मालपुआ कृती

१. सर्वप्रथम मालपुआ बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूधात साखर टाकून जवळपास अर्धा तास गॅसवर ठेवा.

२. नंतर गव्हाच्या पिठात नारळाचा किस आणि वेलदोड्याचा कुट टाकून चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.

३. आता यात दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्या.

४. आता एका कढईत तूप गरम करा आत एक मोठा चमचा तूप या घट्ट पेस्टमध्ये घाला.

हेही वाचा >>पडवळची भाजी आवडत नाही? अशा पद्धतीने बनवा स्टफ पडवळ, सगळे खातील आवडीने

५. आता पुआ दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. तुमचा टेस्टी मालपुआ खाण्यासाठी तयार आहे.

(सौजन्य – google trend)

वर दिलेल्या गुगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, अठरा तासांमध्ये १ हजारांपेक्षा अधिक युजर्सनी मालपुवा हा विषय सर्च केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular indian dessert deep fried khawa malpuas recipe for durga puja 2024 recipe trending on google trends srk