दैनंदिन आयुष्यात जीवनशैली उंचावण्यासाठी प्रत्येक माणसाला अनेक प्रकारचे छंद, आवडी-निवडी असतात. प्रत्येक गोष्ट ही मोठ्या ब्रॅंडप्रमाणे मिळाली पाहिजे, जणू काही असाच अट्टहास सर्वांचा असतो. अशातच फिरण्यासाठी कार खरेदी करायचं झालं, तर नुसती घाईच झालेली असते. परंतु, जर का हीच कार वेळेत मिळाली नाही, तर कार कपंनीबाबत नाराजीचा सूर उमटू लागतो. कार वेटिंगवर गेल्यावर एवढं दु:ख होतं. मग खाण्याचा पदार्थ वेटिंगवर असेल, तर किती राग येईल, याचा नेम नाही. कारण जपानचा एक बीफ क्रोकेट्स नावाचा पदार्थ तब्बल तीस वर्षांच्या वेटिंग पिरिएडवर असतो. जाणून घेऊयात हा पदार्थ नेमका कोणत्या प्रकारचा आहे.
कोबे बीफ क्रोकेट्स नावाचा जपानी पदार्थ एका हॉटेलच्या मेनूत समावेश केल्यानंतर खवय्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. वर्ल्डवार २ नंतर हा पदार्थ जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय बेकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या पफसारखा हा पदार्थ असतो. ग्राहकांनी ऑर्डर केलेला कोबे बीफ क्रोकेट्स टाकासागो येथील पश्चिम ह्योगो प्रीफेक्चर आसहिया शॉपमध्ये उपलब्ध आहे.
या शॉपमधून १९२६ पासून प्रोडक्टची विक्री केली जाते. कोबे बीफ क्रोकेट्स असहीया या शॉपमध्ये सर्वात जास्त विकला गेलेला पदार्थ आहे. परंतु, हा पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांना तब्बल तीस वर्ष वाट पाहावी लागते. एप्रिल महिन्यात एका ट्विटर युजरने हा पदार्थ ऑर्डर केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर कॅप्शन लिहित या युजरने म्हटलं, मी नऊ वर्षांपूर्वी ऑर्डर केलेलं क्रोकेट्स आता मिळालं आहे. ८ सप्टेंबर २०१३ ला तिनं या पदार्थाची ऑर्डर दिली होती. जवळपास साडेसात वर्ष हा पदार्थ मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल, असं तिला सांगण्यात आलं होतं. पण ही प्रतीक्षा वाढतंच गेली, कारण या पदार्थासाठी आवश्यक असणारे बटाटे मिळवण्यात अडचणी आल्या.
आसहीयाच्या तिसऱ्या पिढीतील मालक शिगेरू नित्ता सीएनएनशी बोलताना म्हणाल्या, आम्ही २०१६ मध्ये हा पदार्थ विक्री करण्याचं थांबवलं. कारण वेटिंग पिरिएड १४ वर्षांवर गेला होता. ऑर्डर थांबवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पण आम्हाला ग्राहकांकडून या पदार्थासाठी मागणी वाढवण्याची विनंती केली जात आहे. सुरुवातीला हा पदार्थ एका पिससाठी $1.80 (146.9) एवढ्या रुपयांना मिळत होता. पण त्यानंतर या पदार्थाची किंमत वाढून $2.70 (Rs 220) एवढी झाली. २०१७ मध्ये त्यांनी हा पदार्थ पुन्हा सुरु करुन किमती वाढवल्या. दरम्यान, हा पदार्थ आज ऑर्डर केल्यास ३२ वर्ष वाट पाहावी लागेल, असं आश आसहीयाच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.