अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारण केल्याच्या आरोपाखाली कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मढ येथे पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या कारवाईचे धागेदोरे राज कुंद्रांपर्यंत येऊन पोहचले आणि त्यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असल्याने तेच या पॉर्न प्रकरणाचे मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सध्या कुंद्रा हे भायखळ्यातील तुरुंगामध्ये आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी मिम्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमधील व्यक्ती पॉर्नसारख्या उद्योगांमध्ये सहभागी असल्यावरुन टीकेची झोड उठवलीय. मात्र असं असतानाच गुगलच्या डेटामध्ये भारतीय हे पॉर्न सर्च करण्यामध्येही आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. याच प्रकरणाशी संबंधित सांगायचं झाल्यास सोमवारपासून भारतीयांनी देशातील करोना संकटापेक्षा पॉर्न आणि राज कुंद्रा यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केलं आहे.
नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी
गुगल ड्रेण्डवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतामधील लोक हे करोनापेक्षाही पॉर्नसंदर्भात अधिक प्रमाणात गुगल सर्च करतात. राज कुंद्रा यांना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. मात्र त्या दिवशी त्यांच्यासंदर्भातील सर्च वाढल्याचं गुगलच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र १९ तारखेच्याआधीपासूनच म्हणजेच १४ जुलैपासून पॉर्नसंदर्भातील सर्च हा करोनाव्हायरस संदर्भातील सर्चपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पॉर्नसंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
नक्की पाहा >> पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडती वेळ माहित्येय का?; गुगलचा खुलासा
पॉर्नसंदर्भातील सर्चमध्ये रिलेटेड टर्म म्हणजेच पॉर्न हा विषय कशाच्या संदर्भाने सर्च झाला यामध्ये मागील सात दिवसांमध्ये राज कुंद्रा यांच्याच नावाच समावेश आहे. ‘राज कुंद्रा पॉर्न’, ‘राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ’, ‘राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओज’, ‘राजकुंद्रा पॉर्न’, ‘राज कुंद्रा पॉर्न मुव्हीज’ हे सर्च मागील काही दिवसांपासून पॉर्नसंदर्भातील सर्चमध्ये अव्वल आहेत. त्यामुळेच एकीकडे राज कुंद्रांवर टीका होत असतानाच दुसरीकडे गुगलच्या डेटामध्ये मात्र त्यांच्या अटकेचासंदर्भ असणाऱ्या पॉर्नबद्दल आणि त्यांनी बनवलेल्या चित्रपटांबद्दल सर्च होण्याचं प्रमाण वाढल्याचं विरोधाभास दिसणारं चित्र स्पष्ट होत आहे.
पॉर्न ही टर्म सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्वेकडील राज्य आघाडीवर असल्याचं चित्र या ट्रेण्डमधून दिसून येत आहे. मणिपूर, मिझोरम आणि नागालँड ही तीन राज्ये पॉर्नसंदर्भात सर्च करण्यामध्ये अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहेत त्या खालेखाल टॉप पाचमध्ये असणारी अन्य दोन राज्येही पूर्वेकडील राज्यांपैकीच आहेत. अरुणाचल प्रदेश चौथ्या तर आसाम पाचव्या स्थानी आहे. त्या खालोखाल मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक पॉर्न सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत आहे.
नक्की वाचा >> पॉर्न सिनेमा प्रकरण : कुंद्रांच्या अटकेनंतरचे Google Search पाहून व्हाल थक्क; महाराष्ट्र आघाडीवर
११ व्या क्रमांकावर पंजाब, १२ व्या क्रमांकावर त्रिपुरा, १३ व्यावर पश्चिम बंगाल, १४ व्या स्थानी आंदमान निकोबार, १५ व्या स्थानी गुजरातचा समावेश आहे. उत्तर प्रदेश (१६), उत्तराखंड (१७), राजस्थान (१८), बिहार (१९), छत्तीसगड (२०) या राज्यांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा ही पुढील पाच राज्य आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्र २६ व्या स्थानी आहे. महाराष्ट्राखालोखाल गोवा, दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचाही अव्वल ३० मध्ये समावेश आहे.
नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल
या ट्रेण्डमधून रात्रीच्या वेळेस भारतीय मोठ्या संख्येने पॉर्नसंदर्भात सर्च करत असल्याचं स्पष्ट होत आहे.