अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारण केल्याच्या आरोपाखाली कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मढ येथे पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या कारवाईचे धागेदोरे राज कुंद्रांपर्यंत येऊन पोहचले आणि त्यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असल्याने तेच या पॉर्न प्रकरणाचे मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सध्या कुंद्रा हे भायखळ्यातील तुरुंगामध्ये आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी मिम्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमधील व्यक्ती पॉर्नसारख्या उद्योगांमध्ये सहभागी असल्यावरुन टीकेची झोड उठवलीय. मात्र असं असतानाच गुगलच्या डेटामध्ये भारतीय हे पॉर्न सर्च करण्यामध्येही आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. याच प्रकरणाशी संबंधित सांगायचं झाल्यास सोमवारपासून भारतीयांनी देशातील करोना संकटापेक्षा पॉर्न आणि राज कुंद्रा यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा