भारतावर टीका करण्याच्या नादात भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील तरुण म्हणून चक्क जॉनी सीन्स या पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला होता. यावरुन आता जॉनी सीन्सने बासित यांना माझी नजर ठिक असल्याचे उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी बासित यांनी काश्मीरमधील जखमी तरुण म्हणून जॉनी सीन्सचा फोटो रिट्विट केला होता. यावरुन बासित यांना ट्रोल करण्यात आल्यानंतर आता जॉनी याने ट्विट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉनी सीन्स या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारे काश्मीर संदर्भातील एक खोटे ट्विट काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. ‘अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटला आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा,’ अशा कॅप्शनसहीत जॉनी सीन्सचा एका महिलेबरोबरच फोटो ट्विट करण्यात आला होता. हेच ट्विट बासित यांनी रिट्विट केले होते.

नक्की वाचा >>
काश्मिरी तरुण म्हणून पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांनी शेअर केला पॉर्नस्टारचा फोटो

आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले असले तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स व्हायरल झाले. यावरच जॉनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ‘अब्दुल बासित यांच्यामुळे मला नवे ट्विटर फॉलोअर्स मिळाले आहेत. धन्यवाद पण माझी नजर व्यवस्थित आहे’ असं जॉनीने ट्विट केलं आहे.

दरम्यान बासित यांनी केलेल्या रिट्वीटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी त्यांच्यावर ट्विटवरुन टीका केली.

खरंच कहर

आता तो दगडफेक करणारा झाला

जॉनी थेट अनंतनागमध्ये?

हे अधिकारी आहेत

हा पुरावा

नक्की वाचा कहर! पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’कडे केली भारताची तक्रार

भारतावर टिका करताना पाकिस्तानच्या नेत्यांनी अशाप्रकारे खोटे तसेच मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खोटे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनाही ट्विटरने नोटीस पाठवली आहे. तर याआधी पाकिस्तानच्या सिनेटचे सदस्य रेहमान मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले होते.