Pune Porsche Accident : पुण्यामध्ये शनिवारी रात्री मद्यपान करून महागड्या पोर्श गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट असे मृतांचे नाव आहे. या अपघातानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजरही करण्यात आल होते. मात्र तो अल्पवयीन आहे म्हणून न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. न्यायालयाने, अपघाताबाबात ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावला. आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलबरोबर वाहतुकीचं नियोजन करावं, या दोन अटीवर त्याला जामीन मंजूर केला होता. याशिवाय पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नव्हती. या घटनेबद्दल सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या शिक्षेबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा