भारतात जोडीदार शोधणे खूप आव्हानात्मक असू शकते. मुंबईतील एका ३७ वर्षीय महिला जोडीदाराच्या शोधात आहे. महिलेला कसा जोडीदार हवा आहे याच्या अपेक्षा सांगितल्या आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. महिलेच्या जोडीदारांच्या अपेक्षांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टचे मराठीतून इंग्रजीमध्ये केलेले भाषांतर चर्चेत आले आहे.
‘अंबर’ या नावाच्या खात्यावरून एक्सवर चॅटचे स्क्रिन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की, “ती महिला एका जोडीदाराच्या शोधात आहे जो किमान वार्षिक १ कोटी रुपये कमावतो. पोस्टमध्ये दावा केला आहे की,”ही महिला गेली १० वर्षे मुंबईत काम करत आहे आणि तिला उच्च शिक्षित जोडीदार हवा आहे, शक्यतो सर्जन किंवा चार्टर्ड अकाउंटंट असावा. त्याच्याकडे स्वतःचे घर असावे अशीही महिलेची इच्छा आहे आणि जर परदेशात असेल तर ती युरोपमध्ये इटली देशातील तरुणाला प्राधान्य देईल.
येथे पोस्ट पहा:
एक्सवर ५,८२,००० पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणीची बाजू घेतली आहे तर काहींनी तरुणींच्या अपेक्षेवर टिका केली आहे. पोस्टवर एकाने कमेंट केली की, “यामध्ये काहीही चुकीचे नाही. प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तिला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनाही तिला नाकारण्याचा अधिकार आहे.”
आणखी एका युजरने लिहिले की, “आयटी डेटानुसार, भारतात फक्त १.७ लाख लोकांचे उत्पन्न १ कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी स्वप्नवत जोडीदार माणूस शोधण्याची शक्यता ०.०१% आहे.
हेही वाचा – सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
“नवरादेवाने पण म्हणावं ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे, पण जर काही जमलं नाही तर तुम्ही पोटगी मागणार नाही आणि कुठल्यातरी वकिलाच्या उपस्थितीत कागदावर सही करून घेईन!!!!” अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली.