Kitchen Jugaad: घरची अनेक कामं करताना महिलांना अनेक किचन टिप्स, ट्रिक्स, जुगाड आपोआप कळू लागतात. या ट्रिक्समुळे त्यांची अनेक कामं सोपी होऊन जातात आणि लागणारा जास्त वेळदेखील बऱ्यापैकी कमी होतो. म्हणूनच अनेकदा किचनमधलं अवघड काम सोपं कसं करावं याबद्दल विचारायचं असेल, तर घरची गृहिणीच आठवते.
सोशल मीडियावर अनेकदा अशा जुगाडांचे अनेक व्हिडीओ महिला शेअर करीत असतात. सध्या एका गृहिणीनं खास महिलांसांठी असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
बटाटे सोलण्याचा भन्नाट जुगाड
बटाटा हा अनेक डिशमध्ये वापरला जातो. सगळ्यांच्या आवडीचा असलेला हा बटाटा प्रत्येकाच्या घरी खाल्ला जातो. काही रेसिपी बनविण्यासाठी बटाट्याच्या साली काढणं महत्त्वाचं ठरतं आणि अनेकदा त्याचाच कंटाला सगळ्यांना येतो. पण, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका गृहिणीनं उकडलेल्या बटाट्याची साल अगदी काही सेकंदांतच कशी काढायची, याचा जुगाड शेअर केला आहे.
गृहिणीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तिनं उकडलेला बटाटा अगदी सोप्या पद्धतीनं कसा सोलावा याचा जुगाड सांगितला आहे. व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे या गृहिणीनं आधी उकडलेला बटाट्याचे दोन भाग करून घेतले. एका गोल वाटग्यावर फ्राईंग स्पून (Spider Strainer Skimmer/Frying spoon) उलट्या दिशेने ठेवून त्यावर बटाटा दाबून घेतला आहे. चमच्यामुळे बटाटा त्या वाटग्यात पडून, त्याचं साल बाहेरच्या दिशेनं राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
सोशल मी़डियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aayushi.gupta.73113528 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बटाटा सोलण्याची ट्रिक, आधी माहीत असती, तर बरे झाले असते!’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच १२३ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं की, खूप छान, मीदेखील हे ट्राय करेन. दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं की, मी हे घरी ट्राय केलं; पण त्यामुळे माझं काम होण्याऐवजी बिघडलं. तिसऱ्यानं, “अजून एक भांडं खराब करण्यापेक्षा मी हातानंच करेन”, अशी कमेंट केली.